‘माउंटन हायकर्स’ संस्थेतर्फे येत्या ८ डिसेंबर रोजी जीवधन आणि नाणेघाट येथे पदभ्रमणाचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी आदित्य फडतरे (९७३०८९५६७८) किंवा वल्लरी पाठक (७७५७०२३५६७) यांच्याशी संपर्क साधावा.
राजगड प्रदक्षिणा
‘दि नेचर लव्हर्स’ संस्थेतर्फे येत्या २२ ते २५ डिसेंबर दरम्यान राजगड प्रदक्षिणा मोहिमेचे आयोजन केले आहे. राजगड ही शिवाजी महाराजांची राजधानी. या गडाला तळातून विविध गावांतून, जंगल-झाडीतून फेरी मारली जाणार आहे. या अभिनव अशा उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी शंशाक म्हदनाक (९९३०७२४०७१) किंवा विनोद पाटी (९८९२६५८४७५) यांच्याशी संपर्क साधावा.
हडसर, जीवधन, रतनगड पदभ्रमण
‘डोंगरी-अॅन ऑर्गनायझेशन फॉर अॅडव्हेंचर’ संस्थेच्या वतीने १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत हडसर-जीवधन-चवंड येथे तसेच २८ आणि २९ डिसेंबर रोजी रतनगड येथे पदभ्रमणाचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी निशिकांत तावडे (९८६७४२०८५६) सागर शेंडे (९९२०८५००६) यांच्याशी संपर्क साधावा.
कच्छचे धाकटे रण
कच्छचे धाकटे रण हा एक विस्तीर्ण खारजमिनीचा प्रदेश आहे. अनेक प्राण्यांचे इथे दर्शन घडतेच पण पक्षिनिरीक्षकांसाठी ही पंढरी म्हणून ओळखली जाते. येथील तलाव व पाणथळींमध्ये विविध पक्षी प्रजाती पाहायला मिळतात. थंडीत क्रौंच, रोहित, झोळीवाला, करकोचा, शराटी, चमचा व विविध बदकं मोठय़ा संख्येने दिसतात. त्याशिवाय विविध प्रकारचे गरूड, बाज व ससाणे तिथे दिसतात. वन्यप्राण्यांमध्ये रानगाढवांव्यतिरिक्त लांडगा, भारतीय खोकड, वाळवंटी खोकड, कोल्हा, रान मांजर, वाळवंटी मांजर, तरस, नीलगाय, चिंकारा व काळवीट इथे  दिसतात. अशा या कच्छच्या धाकटय़ा रणच्या भटकंतीचे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीने १० ते १३ डिसेंबर दरम्यान आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी ुल्लँ२.स्र्१ॠ१ंेी२@ॠें्र’.ूे या संकेतस्थळावर किंवा हॉर्नबिल हाउस (०२२-२२८२१८११/ २२८७१२०२) इथे संपर्क साधावा.
अरुणाचल प्रदेशमधील जंगल सफारी
निसर्ग सोबती तर्फे १६ ते २३ फेब्रुवारी दरम्यान अरुणाचल प्रदेश मधील नामदफा नॅशनल पार्क येथे जंगल सफारीचे आयोजन केले आहे. या जंगलात हिम बिबळ्या, ब्लॅक बिअर, रेड पांडा आदी प्राणी तसेच ४२५ हून अधिक प्रकारचे पक्षी दिसतात. अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७.) यांच्याशी संपर्क साधावा.