सोशल मीडियावर सतत वेगवगेळ्या गोष्टींची चर्चा सुरु असते. त्याचप्रमाणे सध्या 10yearschallange सध्या मोठ्या प्रमाणात गाजत आहे. हे जोरदार चॅलेंज ट्रेंडही होत आहे. अनेक सेलिब्रिटी, खेळाडू, उद्योगपती आणि सामान्य नागरिकही आपला १० वर्षांपूर्वीचा म्हणजेच २००९ मधील फोटो आणि आताचा फोटो एकत्रितपणे सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. यामध्ये भाग घेत क्रिकेटपटू रोहित शर्माने एक अनोखा फोटो शेअर केला आहे. यात त्याने समुद्रातील जीवसृष्टीचा एक फोटो शेअर केला आहे. यात २००९ मधील फोटोत अनेक रंगीबेरंगी प्रवाळ आणि मासे दिसत आहेत. तर आताच्या २०१९ च्या फोटोत सगळे रिकामे दिसत आहे. त्यामुळे या फोटोद्वारे रोहितने पर्यावरणाच्या बाबतीत एका महत्त्वाच्या गोष्टीवर भाष्य केले आहे असे म्हणायला हरकत नाही.

विशेष म्हणजे त्याच्या या ट्विटवर खूप प्रतिक्रिया आल्या असून असंख्य लोकांनी ते रिट्विट केले आहे. या परिस्थितीमुळे आपण विशेष काळजी घ्यायला हवी असे त्याने ही पोस्ट करताना म्हटले आहे. ३७ हजार जणांनी हा व्हिडियो लाईक केला असून ७ हजार जणांनी हे ट्विट रिट्विट केले आहे. बऱ्याच जणांनी यामध्ये पर्यावरणाचे इतरही कसे नुकसान झाले आहे, याचे फोटो शेअर केले आहेत. या आगळ्या वेगळ्या चॅलेंजचे मिम्स व्हायरल झाले आहेत. यामध्ये अगदी मराठी मालिकांपासून ते राजकारण आणि खेळांपर्यंतचे अनेक प्रकारचे मिम्स सोशल मडियावर व्हायरल झाल्याचे दिसून येत आहेत.