अनेक देशांत पायाभूत सुविधांची कामं वर्षांनुवर्षे रखडलेली आपण पाहिली, वाचली, ऐकली असतील. कुठे दशकभरापूर्वी पूर्ण झालेल्या रस्त्याचं काम रखडलेलं असतं तर कुठे अब्जावधी खर्चूनदेखील बांधकाम पूर्ण झालं नसतं, अशी परिस्थिती आपल्याच काय पण, जगाच्या पाठीवरील अनेक देशांत आहे. पण चीन या बाबतीत काहीसा पुढे आहे. या देशात नुकताच ९ तासांत रेल्वेमार्ग बांधण्यात आला. दीड हजार कामगारांनी मेहनत घेऊन १९ जानेवारीला रेल्वेमार्ग बांधायला सुरूवात केली आहे आणि दुसरा दिवस उजाडेपर्यंत याठिकाणी रेल्वेमार्ग बांधून पूर्ण झाला होता.

२२ वर्षांपासून वाळूच्या किल्ल्यात राहणाऱ्या ‘राजा’ला पाहिलात का?

‘ते’ ट्विट भोवलं, L’Oreal च्या जाहिरातीतून मुस्लिम मॉडेलची माघार

टोल वाचविण्यासाठी मुंबईकराने चालवली अनोखी शक्कल

‘द शिनुआ’ या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार नँनलाँग रेल्वे स्टेशनवर हे बांधकाम सुरू होतं. तीन महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनला जोडणारा मार्ग तयार करण्याचं आवाहन कामगारांपुढे होते आणि हे आवाहन पेलत काही तासांत हा रेल्वेमार्ग तयार करण्यात आला. हा रेल्वेमार्ग २५६ किलोमीटर लांब आहे आणि याचं जवळपास सर्वच काम पूर्ण झालं आहे. इथल्या स्थानिक लोकांना दळणवळणाच्या अधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी तातडीनं हा रेल्वेमार्ग बांधण्यात आल्याचं द शिनुआनं म्हटलं आहे. फक्त हा रेल्वेमार्गच नाही तर याआधी पूल, रस्तेदेखील काहीदिवसांच्या अवधीत येथे बांधण्यात आल्याची अनेक उदाहरणं सापडतात.