News Flash

फॉर्म १६ नाही, नो टेन्शन! असा भरा इन्कम टॅक्स रिटर्न..

या महत्त्वाच्या टप्प्यांचा जरुर विचार करा

प्रतिकात्मक छायाचित्र

आपण जे उत्त्पन्न मिळवतो त्यावर टॅक्स भरावा लागतो. दरवर्षी हे एक महत्त्वाचे काम असते. आपले सगळे अर्थिक व्यवहार या गोष्टीशी निगडीत असतात. त्यामुळे अर्थिक वर्षाअखेर हे काम योग्य पद्धतीने होणे अतिशय महत्त्वाचे असते. यासाठी या प्रक्रियेची योग्य ती माहिती करुन घेणे गरजेचे आहे. ३१ जुलै रोजी टॅक्स भरण्याची शेवटची तारीख असल्याने टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांनी खालील गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी. टॅक्स भरत असताना फॉर्म १६ अतिशय महत्त्वाचा असतो. तुम्ही नोकरदार असाल तर तुम्हाला फॉर्म १६ बाबतची माहिती असणे आवश्यक आहे. समजून घेऊया यातील महत्त्वाचे टप्पे…

फॉर्म १६ म्हणजे काय आणि तो का महत्त्वाचा असतो?
– तुमच्या कंपनीने भरलेल्या टीडीएसची माहिती फॉर्म १६ मध्ये असते. त्यामुळे तुमच्या टॅक्सच्या रकमेची माहिती देणारे हे एक महत्त्वाचे कागदपत्र असते. जर तुमच्या कंपनीकडून काही कारणांनी तुम्हाला फॉर्म १६ देण्यात आला नाही तरी तुम्ही टॅक्स रिटर्न भरु शकणार नाही असे नाही. तर तुम्ही तुमचे रिटर्न फॉर्म १६ शिवायही भरु शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला त्याची योग्य ती माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्याकडे फॉर्म १६ नसेल तर तुम्ही कशाप्रकारे इन्कम टॅक्स रिटर्न भरु शकता याविषयी…

१. फॉर्म १६ मध्ये तुमचे कर लागू असणारे उत्पन्न दिसत असते. तेच उत्पन्न तुमच्या पे स्लिपवर दिसते. त्यामुळे तुमच्या पे स्लिप व्यवस्थित ठेऊन तुमचे टॅक्सेबल इन्कम किती आहे याची माहिती करुन घ्या.

२. फॉर्म २६ एएस मध्ये तुमचे वर्षाचे एकूण उत्पन्न आणि त्यावर लागू झालेला कर यांची माहिती दिसते. तुमच्या उत्पन्नावर विविध स्तरातून मिळालेल्या कराची यामध्ये नोंद केलेली असते. तुमची पे स्लिप तुमचा पगार दाखविते तर फॉर्म २६ एएसमध्ये तुमच्या कापलेल्या कराची रक्कम दिसते. ही दोन्हीही कागदपत्रे टॅक्स भरण्यासाठी आवश्यक असतात.

३. तुमच्या करासाठी कापली जाणारी रक्कम तुम्ही तुमच्या पगारातून वजा करु शकता. घरभाडे, प्रवासखर्च यांसारख्या काही गोष्टी तुमचे टॅक्सेबल इन्कम कमी करतात. हे उत्पन्न टॅक्सेबल उत्पन्न असल्याने ते तुमच्या पगारात जमा होते.

४. तुमच्या सॅलरी इन्कमशिवाय तुम्ही इतरही काही उत्पन्न मिळवत असाल तर तेही यामध्ये टॅक्स रिटर्नमध्ये नोंदविणे गरजेचे असते. यामध्ये मुदत ठेवी, बचत खाते, शेअर्स आणि म्युच्युअल फंडातून मिळालेला नफा, एखाद्या प्रॉपर्टीच्या भाड्यातून मिळणारी रक्कम, यांचा यामध्ये समावेश असतो.

५. टॅक्स फायलिंग फॉर्मची योग्य पद्धतीने माहिती घेणे आवश्यक असते. तुम्ही वैयक्तिक स्तरावर जर टॅक्स भरणार असाल तर ही माहिती अत्यावश्यक असते. ITR 1, ITR 2, ITR 2A, Form 3, Form 4 आणि Form 4 A यांचा नोकरदारांसाठी उपयोग होतो. यामध्येही तुम्ही ITR 2, ITR 2A and ITR 4 हे फॉर्म भरत असाल तर तुम्हाला सॅलरीची विस्ताराने माहिती द्यावी लागते.

६. तुम्ही वरील सर्व पायऱ्या योग्य पद्धतीने केल्या तर तुमचे करदायित्व किती आहे हे तुम्हाला योग्य पद्धतीने समजू शकते. ही रक्कम आधी भरलेल्या टीडीएसशी तुलना करुन पाहणे आवश्यक आहे. तुमच्या करदायित्वापेक्षा तुम्ही जास्त टीडीएस भरला असेल तर तुम्ही टॅक्स रिफंडसाठी क्लेम करु शकतात. याच्या उलट करदायित्व जास्त असेल तर तुम्हाला जास्तीची कराची रक्कम भरावी लागते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 5:37 pm

Web Title: 6 steps to file income tax return without form 16
Next Stories
1 लाखो तरुणींना घायाळ करणाऱ्या पाकिस्तानी चहावाल्याचं सत्य उघड!
2 Video : आयला ! सोनू निगम ढिंच्याक पूजाचा फॅन?
3 पंतप्रधान मोदी वापरत असलेल्या पेनाची किंमत लाखांच्या घरात?
Just Now!
X