एवढया मोठ्या विमानात शेकडो प्रवाशांना बसवून समोरच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या आणि अगम्य भाषेत ऐकू येणाऱ्या खुणा, संदेशाबरहुकूम विमान चालवणे हे कौशल्याचे काम असते. जमिनीपासून हजारो फूट उंचीवर विमान उडवणाऱ्या वैमानिकाची नोकरी आपल्याला नेहमीच आकर्षक आणि रोमांचक वाटते. पण वैमानिकांची ही नोकरी खरेच रोमांचक असते का? अॅडिलेड येथे घडलेल्या एका घटनेमुळे असे वाटतेय की, वैमानिकाही आपल्या कामाला कंटाळतो.

सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका वैमानिकाने हवाई प्रात्यक्षिकादरम्यान आकाशातच ‘I’m Bored’ म्हणजे मी कंटाळलो असे रेखाटलं आहे. जमिनीवरून हे दिसून येत नाही. पण विमानाला ट्रक करणाऱ्या प्रोग्राम आणि वेबसाइटवर ‘I’m Bored’ रेखाटलेलं दिसत आहे.

ऑस्ट्रेलियातील डायमंड स्टार प्लेनमधील एका वैमानिकाने फ्लाईट ट्रेनिंग दरम्यान तीन तास विमानाला आकाशात अशा पद्धतीने फिरवले की, दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या आकाशातच ‘I’m Bored’ म्हणजे मी कंटाळलो असे रेखाटलं आहे. हे शब्द जवळजवळ १२ किमीपर्यंत आकाराचे आहेत. फ्लाइट अवेयर वेबसाइटने वैमानिकाच्या या प्रात्यक्षिकाला कैद केले. त्यानंतर सोशल मीडियावर हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, अशा प्रकारची आकाशात काही रेखाटण्याची ही पहिलीच घटना नव्हे. याआधी जून २०१७ मध्ये अमेरिकेतील एका वैमानिकाने गुप्तांग रेखाटलं होतं. तर २४ फेब्रुवारी रोजी इस्टोनिय रिपब्लिकच्या १०१ व्या स्वातंत्र्य दिनी एका वैमानिकाने आकाशात १०१ अंक रेखाटला होता.