उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील एक धक्कादायक घटनाक्रम कॅमेरामध्ये कैद झाला आहे. एका उंच इमारतीच्या बाहेरुन शूट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला एका व्यक्तीचा हात पकडून इमारतीच्या नवव्या मजल्याच्या बाल्कनीमधून बाहेर लटकताना दिसत आहे. काही वेळ हात धरुन राहिल्यानंतर या व्यक्तीची पकड सैल होते आणि या महिलेला सुखरुप वर ओढून घेण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतो. महिलेचा हात सुटतो आणि ती नवव्या मजल्यावर खाली पडते. एवढ्या उंचावरुन खाली पडल्यानंतरही ही महिला आश्चर्यकारकरित्या वाचलीय.

नक्की पाहा >> “या फोटोला कॅप्शन सुचवा…”; पेट्रोल पंपावरच मोदींसमोर लोटांगण घातल्याचा फोटो झाला व्हायरल

Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक
Afgan Women
‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा

व्हिडीओमध्ये बल्कनीमधून लटकणारी ही महिला हात सुटून खाली पडण्याआधी इमारतीमधील काही नागरिकांनी ती पडण्याची शक्यता असणाऱ्या जागी गाद्या आणून ठेवल्याने या महिलेचा जीव वाचलाय. ही महिला या गाद्यांवर पडल्याने तिचा जीव वाचला असला तरी तिला गंभीर दुखापत झालीय. एनडीटीव्हीला एका साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार या महिलेचे आणि तिचा हात पकडून असणाऱ्या व्यक्तीचं जोरदार भाडंण झालं आणि त्यानंतर ही महिला बाल्कनीच्या लोखंडी रेलिंगवर चढली आणि तिने उडी मारण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओमध्ये या महिलेचा हात पकडून तिला वाचवण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती तिचा नवरा असल्याचं सांगण्यात येत आहे.

नक्की पाहा >> Video : मुंबईच्या वेशीवर ‘लाल चिखल’; Eastern Express Highway वर पडला २० टन टोमॅटोचा खच

या व्यक्तीने बाल्कनीमधून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला एका हाताने जवळजवळ तीन मिनिटांसाठी धरुन ठेवलं होतं. मात्र कोणीच मदतीला न आल्याने हळूहळू त्याचा हात सुटला आणि ही महिला नवव्या मजल्यावरुन खाली पडली. मात्र इमारतीमधील लोकांच्या समजुतदारपणामुळे आणि तातडीने खाली गाद्या आणून टाकल्यामुळे या महिलेचा प्राण वाचले. या महिलेला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेचा व्हिडीओ एका पत्रकाराने ट्विट केलाय.

या प्रकरणामध्ये अद्याप पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आलेली नसती तरी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या दोघांमध्ये नेमकं काय घडलं यासंदर्भात पोलिसांनी महिलाचा हात धरुन तिला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या नवऱ्याकडे चौकशी केली आहे. ही महिला अद्याप बेशुद्धावस्थेत असल्याने पोलिसांनी तिचा जबाब अद्याप नोंदवला नाही. या महिलेला शुद्ध आल्यानंतर आम्ही तिचा जबाब नोंदवणार आहोत. त्यामधून आम्हाला नक्की या दोघांमध्ये काय घडलं याची माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.