जवळ जवळ आठ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१२ साली २१ डिसेंबर २०१२ ला जग संपणार अशी जोरदार चर्चा सुरु होती. मायन संस्कृतीच्या कालगणनेनुसार या दिवशी पृथ्वीचा नाश होणार असं सांगितलं जातं होतं. यावर आधारित एक चित्रपटही ‘२०१२’ नावाने प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. वर्ष संपण्यासाठी दहा दिवस शिल्लक असताना येणाऱ्या २१ डिसेंबरची त्या पूर्ण वर्षभर चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र आता इंटरनेटवर पुन्हा अशाप्रकारची चर्चा रंगू लागली आहे आणि त्याला कारणही आठ वर्षांपूर्वीचेच आहे. मायन संस्कृतीच्या कालगणनेनुसार पुढच्या आठवड्यामध्ये जगाचा अंतर होणार असल्याची चर्चा इंटरनेटवर रंगली आहे. या चर्चेचा तोंड फुटण्याचं कारण म्हणजे ‘द न्यू यॉर्क पोस्ट’मधील एक बातमी.

एका सिद्धांतानुसार मायन संस्कृतीची कालगणना वाचण्यामध्ये चूक झाली आहे. या चूकीमुळेच जग २०१२ ला संपेल असं सांगतिलं होतं. मात्र आता जगाचा अंत हा याच वर्षी जून महिन्यामध्ये होणार असल्याचा दावा केला जात आहे. नवीन दाव्यानुसार या मायन संस्कृतीच्या ज्युलीयन कालगणनेनुसार आपण सध्या २०२० मध्ये नसून २०१२ मध्ये आहोत असं सांगितलं जात आहे. लंडनमध्ये राहणारे वैज्ञानिक पाओलो टाबेलोगेन यांनी एक ट्विट केलं होतं असं ‘द न्यू यॉर्क पोस्ट’ने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी, “ज्युलीयन कालगणेचानुसार तांत्रिक दृष्ट्या आपण २०१२ मध्ये आहोत. जॉर्जियन कालगणना आणि ज्युलीयन कालगणनेमध्ये दरवर्षी ११ दिवसांचा फरक पडतो. त्यामुळे १७५२ पासून २०२० चा विचार केल्यास २६८ वर्षे होतात. प्रत्येक वर्षाचे ११ दिवस याप्रमाणे ११ गुणे २६८ म्हणजे २९४८ दिवस होतात. २९४८ ला ३६५ ने भाग दिल्यास ८ असे उत्तर मिळते. म्हणजेच आठ वर्षे,” असं म्हटलं होतं.

त्यामुळे हा सिद्धांत खरा आहे असं समजल्यास २०१२ हे वर्ष विनाशाचे असेल असं गणित चुकीचं असल्याचं सांगितलं जात आहे. नवीन दाव्यानुसार जगाचा विनाश हा २१ डिसेंबर २०१२ झाला नाही म्हणजेच तो २१ जून २०२० ला होणार आहे.

हे सारं गणित पाहून नेटकऱ्यांनी या बातमीवर आणि या सिद्धांतासंदर्भात मनसोक्त प्रतिक्रिया देत आपल्या भावाना व्यक्त केल्या आहेत. जाणून घेऊयात काय म्हणायचं आहे त्यांना.

१)
मग बिलं नंतरच भरतो…

२)
चला सगळं माफ करा…

३)
दर चार वर्षांनी असं सांगता

४)
चला बसू

५)
माझ्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी

६)
प्रत्येक शेवट हा…

७)
जरा पुढे ढकला

८)
२०२० पाहता हे खरं वाटतयं

९)
दर वर्षी असे जोक येतात

१०)
हे असं झालं असणार

११)
दहाव्यांदा जग वाचणार

१२)
खरं वाटतयं…

एकंदरितच ही सारी चर्चा आणि जगभरात घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मॅक्सिको आणि ग्वाटेमालमध्ये वास्तव्यास असणाऱ्या मायन संस्कृतीने व्यक्त केलेल्या जगाच्या विनाशाबद्दलच्या चर्चेने पुन्हा डोकं वर काढल्याचं दिसत आहे.