अ‍ॅपल ही तंत्रज्ञान जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक म्हणुन ओळखली जाते. तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारा जवळपास प्रत्येक व्यक्ती अ‍ॅपल कंपनीत काम करण्याचे स्वप्न पाहात असतो. परंतु याच अ‍ॅपलने तब्बल १९० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. हे कर्मचारी अ‍ॅपलच्या अगामी सेल्फ ड्राइविंग कार प्रोजेक्टवर काम करत होते. यांतील ३८ इंजिनीयर प्रोगामिंग, ३३ हार्डवेअर, ३१ प्रोडक्ट डिझाईन, तर २२ सॉफ्टवेअर विभागात काम करत होते. कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्यामागचे कारण अ‍ॅपलने अद्याप स्पष्ट केलेले नाही. या आधीही अनेकदा अ‍ॅपलने आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्याच्या घटना घडल्या आहेत.

सर्जनशीलता व अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी ओळखली जाणारी अ‍ॅपल कंपनी सातत्याने नवनवीन प्रयोग करत असते. सध्या ते सेल्फ ड्राइविंग कारवर संशोधन करत आहेत.

सेल्फ ड्राइविंग कार म्हणजे काय?

कोणतेही वाहन चालवण्यासाठी चालकाची गरज असते. कारण रत्यावर वाहन चालवताना सभोवताली अनेक प्रकारच्या हालचाली होत असतात त्यांचे भान ठेउन वाहन चालवावे लागते. अन्यथा अपघात घडतो. परंतु स्वयंचलित वाहन चालकाविना चालु शकते. यांत अल्ट्रा सॉनिक सेन्सर व कॅमेरे असतात ज्यांच्या मदतीने कार एकाच वेळी चारी बाजुने पाहते व पुढे किती वेगाने जायचे हा निर्णय घेते. चारी बाजुच्या हालचाली टिपण्याचा हा वेग मानवी मेंदूपेक्षा चौपट आहे. तसेच कुठलाही पत्ता शोधण्यासाठी कारमध्ये अत्याधुनिक गुगल मॅपची सुविधा असते. या कारमध्ये एक अत्याधुनिक संगणक असतो ज्याच्या मदतीने कारमधील सर्व यंत्रणा नियंत्रीत केली जाते. अ‍ॅपल व्यतिरीक्त गुगल व टेस्ला या दोन कंपन्या स्वयंचलित वाहनांवर संशोधन करत आहेत.

गेल्या दशकापेक्षा जास्त काळ आयफोन बनवणारी कंपनी म्हणून ख्यातनाम असलेल्या अ‍ॅपलमध्ये रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आलेख चढता राहिलेला आहे. २००५ मध्ये अ‍ॅपलमध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अवघी १४८०० होती. तर २०१८ मध्ये हा आकडा तब्बल १,३२,००० इतका वाढला. कम्प्युटर सॉफ्टवेअर, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स व ऑनलाइन सेवा क्षेत्र अशा विविध क्षेत्रात अ‍ॅपलचा काम विस्तारलं असून जगभरामध्ये त्यांची केंद्रे व कर्मचारी आहेत. भारतामध्येही आयफोनच्या निर्मितीच्या दृष्टीनं उत्पादन केंद्र सुरू करण्याच्या हालचाली करण्यात आल्या होत्या. उलाढालीच्या बाबतीत अ‍ॅपल ही जगातली पंधराव्या क्रमांकाची कंपनी असून आयटी क्षेत्रातली दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे.