06 March 2021

News Flash

Viral Video : जन्मल्यानंतर हत्तीच्या पिल्लाने असं काही केलं की पाहणाऱ्यांना हसू थांबेनासं झालं

हत्तीच्या या पिलाला पाहून तुम्हीही Cute म्हणाल

हत्तीच्या पिलाचे व्हिडीओ सोशल मीडियावर आवडीने पाहिले जातात. इंटरनेटवर असे अनेक व्हिडीओ आहेत जे पाहून हसू थांब नाही. सोशल मीडियावर पुन्हा एक हात्तीच्या पिलाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू तर येईलच शिवाय स्मितहास्य आल्याशिवाय राहणार नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत हात्तीचे पिल्लू अजब पद्धतीनं गवत खात असल्याचं दिसतेय. हत्तीच्या पिलाला गवत खाताना पाहून तुम्हीही त्याला Cute म्हणाल. या व्हिडीओला रीड पार्क जू यांनी आपल्या फेसबुक खात्यावर पोस्ट केलं आहे. व्हिडीओत पाहू शकता की, हत्तीचं पिल्लू जन्मल्यानंतर गवत खात आहे. त्या पिल्लाला माहित नाही की कसं खायचं. सोंडेचा वापर करणे त्याला माहित नाही. हत्तीचं पिल्ली मान खाली घालून सरळ सोंडेने गवत खात आहे.

व्हिडीओ पोस्ट करताना जू ने कॅप्शनमध्ये लिहलेय की, ‘हत्तीच्या पिलाने पावसाचा आनंद घेतला आणि ताजे गवत खाल्ले. हत्तीचे पिल्लू प्राणीसंग्रालयाचं पूर्ण आनंद घेत गवत खात आहे. सोंडेनं गवत कसं खाल्लं जाते याबद्दल पिलाला काहीही माहित नाही. गवत खाण्यासाठी पिलानं आपली पद्धत वापरली आणि सरळ गवत खाल्लं.’

अजब पद्धतीनं गवत खाणाऱ्या हत्तीच्या पिलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन मिनिटांच्या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे. नेटकऱ्यांना हत्तीच्या पिलाची गवत खाण्याची आवडली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 2:42 pm

Web Title: baby elephant learns to graze adorable video is going viral on internet nck 90
Next Stories
1 ‘हा’ फोटो व्हायरल करत आदित्य ठाकरे रियाबरोबर फिरत असल्याचा होतोय आरोप, जाणून घ्या सत्य काय
2 Viral Video : काही फूटांवरुन ‘उडत आला’ रिक्षाचालक आणि…
3 ईईई… सांबारमध्ये मृत पाल, व्हिडीओ झाला व्हायरल; गुन्हा दाखल
Just Now!
X