27 January 2021

News Flash

भीक म्हणून मिळालेल्या लॉटरीच्या तिकीटामुळे चार भिकारी झाले मालामाल

घराचं स्वप्न होणार पूर्ण

(संग्रहित छायाचित्र)

कोणाचा नशीब कधी आणि कसा चमकेल काही सांगता येत नाही. असाच काहीसं घडलं आहे चार भिकाऱ्यासोबत. भीक म्हणून दिलेल्या लॉटरीच्या तिकिटामुळे चारही भिकारी मालामाल झाले आहेत. फ्रेंच लॉटरी संचालक एफडीजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका जुगाऱ्याने भिकाऱ्यांना भीकमध्ये लॉटरीचं तिकीट दिलं आणि भिकाऱ्यांचं नशीब फळफळलं आहे. हे चारही भिकारी लखपती झाले आहेत.

लोकांना भीक मागून पोट भरणाऱ्या भिकाऱ्यांना मिळालेल्या या लाभामुळे आनंद झाला आहे. या पैशातून त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय होणार आहे. लॉटरीच्या तिकिटामुळे बेघर असणाऱ्या चार भिकाऱ्यांना छत मिळालं आहे. शिवाय त्यांच्या खाण्याची सोयही होणार आहे. FDJ ने सांगितले की, या चौघांनी जॅकपॉट वाटून घेतला आहे. इतकी मोठी रक्कम मिळाल्यामुळे त्यांना आता भीक मागण्याची गरज नाही, तर ते आपल्या आलिशान घराचं स्वप्न पूर्ण करू शकतात.

फ्रेंच लॉटरी संचालक एफडीजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार भिकाऱ्यांना ५० हजार यूरोची ( म्हणजेच ४३ लाख रुपयांहून जास्त) लॉटरी लागली आहे. चारही भिकाऱ्यांचं वय ३० वर्षांपेक्षा जास्त आहे. हे चारही जण ब्रेस्टच्या वेस्टर्न पोर्ट सिटीच्या एका लॉटरी शॉपच्या बाहेर भीक मागत होते. एका व्यक्तीने एक युरोचं तिकीट घेतलं आणि ते भीकमध्ये दिलं. या भिकाऱ्यांना पाच युरो नाही तर ५०,००० युरो मिळाल्याचं समजलं तेव्हा लॉटरीचं तिकिट देणारा हैराण झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2020 9:02 pm

Web Title: beggars hit the jackpot with scratchcard that a stranger gifted them nck 90
Next Stories
1 धक्कादायक! महिलेवर सामूहिक बलात्कार कसा करावा? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
2 तेरे जैसा यार कहा…. ११ फूटाचा अजगर ८ वर्षाच्या मुलीचा आहे ‘बेस्ट फ्रेंड’
3 लग्नासाठी अजबच अट; सोशल मीडिया वापरणारी बायको नकोच
Just Now!
X