News Flash

जाणून घ्या डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे

डाव्या कुशीवर झोपण्याचा सल्ला दिला जातो

डाव्या कुशीने झोपल्याने शरीराला अनेक फायदे होऊ शकतात असे एका संशोधनात समोर आले आहे.

झोप ही खूप महत्त्वाची असते. पण, या धकाधकीच्या जीवनात पूरेशी झोप घ्यायला वेळ कोणाला असतो? काम, प्रवास, तणाव यासारख्या गोष्टींचा झोपेवर परिणाम होतो आणि जस जसा व्याप वाढतो तशी झोपही नाहीशी होते. किमान ८ तास झोप ही प्रत्येकाला आवश्यक आहे. कारण जर शांत आणि नीट झोप लागली नाही तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर आणि परिणामी जीवनशैलीवरही होतो. तेव्हा झोपेचे महत्त्व किती आहे हे तुम्ही समजू शकता. पण, झोपताना योग्य पद्धतीने झोपणेही तितकेच गरजे आहे. झोपताना नेहमी डावीकडे कुस करुन झोपावे, डाव्या कुशीवर झोपल्याने शरीराला अनेक फायदे होऊ शकतात असे एका संशोधनात समोर आले आहे.

वाचा :  उशाखाली लसूण ठेवल्यावर असाही फरक पडतो

डाव्या कुशीने झोपण्याचे फायदे
* डाव्या बाजूला झोपण्याने रक्त प्रवाह सुरळीत होतो यामुळे थकवा जाणवत नाही.
* डाव्या कुशीवर झोपल्याने पोटासंबधीच्या समस्या दूर होता.
* पचनप्रक्रिया सुरळीत होते.
* बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांना डाव्या कुशीवर झोपणे फायदेशीर असल्याचे मानले जाते, अन्न पचन सुरळीत होऊन सकाळी पोट साफ होते.
* डाव्या कुशीवर झोपल्याने छातीत जळजळ होण्याची समस्याही दूर होतात.
* मेंदूला होणारा ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो त्यामुळे शरीर निरोगी राहते.
* गर्भवती महिला डाव्या कुशीवर झोपल्याने हाता, पायांना येणारी सूज कमी होते असेही या संशोधनातून समोर आले आहे.
* हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठीही डाव्या कुशीवर झोपणे गरजेचे आहे. असे केल्याने हृदयावर दबाव जाणवत नाही.
( टीप : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित आहे, त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 1:32 pm

Web Title: benefits of left side sleeping
Next Stories
1 नोटाबंदी: बेवफा प्रियकर सापडला बँकेच्या रांगेत
2 नोटाबंदीनंतर वधुच्या मेकअपसाठी पार्लरने दिली EMI ची सुविधा
3 Viral Video : सिंहिणीला छेडणे बेतले तरुणाच्या जीवावर
Just Now!
X