हेल्मेट सक्ती ही चालकाच्या सुरक्षेसाठी आहे हे अनेकांना न रुचणारं आहे. तेव्हा विना हेल्मेट गाडी चालवणारे एक दोन नाही हजारो चालक रस्त्यावर दिसतील. काही दिवसांपूर्वी खुद्द सचिन तेंडूलकरनं व्हिडिओ अपलोड केला होता. रस्त्यावरून विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्यांना तो हेल्मेट घालून गाडी चालवण्याची विनंती करत होता. बिनाहेल्मेट गाडी चालवणं हा गुन्हा आहे. आता आपल्याच सुरक्षेसाठी तयार केलेले हे नियम अनेक चालक सर्रास मोडतात.

सांगूनही न ऐकणाऱ्या अशा चालकांवर बंगळुरूमधल्या एका ट्रॉफिक पोलिसांनं चक्क बूट फेकून मारला. चालक विनाहेल्मट गाडी चालवत  होते तेव्हा त्यांच्यावर बूट भिरकावणारा पोलीस कॅमेरात कैद झाला आहे. एका युट्युबरनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ दोन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. कारवाई करण्याची ही योग्य पद्धत नव्हे अशा शब्दात अनेकांनी वाहतूक पोलिसावर टीका केली आहे. पण, त्याआधी चालक आणि पोलीस यांच्यामध्ये काही वाद झाले होते का हे मात्र कळू शकलं नाही.

दरम्यान हे दृश्य युट्यूबरनं कॅमेरात रेकॉर्ड केलं कसं? असाही प्रश्न विचारला जात आहे. कारण युट्यूबरनं आपल्या गाडीत आधीच कॅमेराची व्यवस्था केली होती. तेव्हा या व्हिडिओच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.