अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. खास करुन भारतीय जनता पार्टीने सुशांतला न्याय मिळवा अशी मागणी करत या प्रकरणातील चौकशीसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. बिहारमध्ये तर भाजपाने हा मुद्दा थेट बिहारी अस्मितेशी जोडला आहे. आगामी विधानसभा निवडणुकींमध्ये या मुद्द्याचा वापर करण्याचा भाजपाचा विचार आहे. बिहार भाजपाच्या कला आणि संस्कृतिक विभागाने सुशांतचा फोटो असणारे स्ट्रीकर्सही छापले आहेत. ‘ना भूले हैं! ना भूलने देंगे!!’ असा मजकूर या स्ट्रीकर्सवर असून सुशांतचा हसरा फोटोही वापरण्यात आला आहे.

बिहार भाजपाच्या कला आणि संस्कृतिक विभागाचे महामंत्री बरुण कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार अशाप्रकारे ३० हजार स्टीकर्स संपूर्ण राज्यामध्ये चिटकवण्यात येणार आहे. मात्र भाजपाने सुशांतचा मुद्दा निवडणुकीसाठी वापरण्यावरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुशांतच्या मृत्यूचा विषय हा राजकीय नसून भावनिक आहे असं सांगणाऱ्या भाजपाने २०१८ साली सुशांतच्या ‘केदारनाथ’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. यासंदर्भात भाजपाने एक मोहिमही चालवली होती. अनेक ठिकाणी यासंदर्भात आंदोलनेही झाली होती.

लोकसभेमध्ये काँग्रेसचे नेते असणाऱ्या अधीर रंजन चौधरी यांनीही ट्विटवरुन यासंदर्भात भाजपावर टीका केली आहे. ‘दिवंगत सुशांत सिंह राजपूत भारतीय अभिनेता होता. मात्र भाजपाने आपल्या राजकीय फायद्यासाठी त्यांना बिहारी अभिनेता म्हणून जाहीर केलं आहे,’ असा टोला चौधरी यांनी लगावला आहे.

सुशांतच्या ‘केदारनाथ’ या चित्रपटाच्या माध्यमातून लव्ह जिहादला प्रोत्सहन दिलं जात आहे असा आरोप भाजपाने २०१८ साली केला होता. आता सोशल मिडियावर भाजपाच्या याच आंदोलनाचे फोटो शेअऱ करुन त्यांच्या भूमिकेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहे. बिहारमधील काही भाजपाविरोधी नेत्यांनाही अशा प्रकारच्या पोस्ट केल्या आहेत.

१)

२)

३)

४)

५)

ट्विटरवर सुशांतच्या अनेक चाहत्यांनी भाजपाच्या या भूमिकेचा समाचार घेतल्याचे चित्र दिसत आहे. जॅमिनी नावाच्या एका चहातीने, “जेव्हा सुशांत जिवंत होता तेव्हा भाजपा त्याच्या ‘केदारनाथ’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत होती. त्यांना वाटत होतं की यामधून लव जिहादला प्रोत्साहन दिलं जात आहे. आता सुशांतच्या मृत्यूनंतर भाजपा सुशांतचा फोटो आपल्या निवडणुकीच्या पोस्टवर वापरताना दिसत आहे,” अशी खंत व्यक्त केली आहे.