News Flash

भाजपाकडूनच बॅन केलेल्या चिनी अ‍ॅपचा वापर; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

CamScannerचा केला वापर

चीननं गलवान खोऱ्यात आगळीक केल्यानंतर दोन्ही देशात तणाव निर्माण झाला होता. या तणावाच्या वातावरणातच भारतानं ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घातली होती. त्यानंतर पुन्हा एकद चिनी अ‍ॅपचा मुद्दा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे याला कारणही भाजपाच ठरली आहे. भाजपानं बॅन केलेल्या CamScannerच्या मदतीनं सोशल मीडियावर प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्तीचं पत्र पोस्ट केलं. त्यानंतर ही चूक लक्षात आलेल्या नेटकऱ्यांनी भाजपालाच ट्रोल करायला सुरूवात केली.

भाजपानं आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी सोमु वीर्राजू यांनी नियुक्ती केली आहे. पण, सोमु वीर्राजू यांची ही नियुक्ती चर्चेचा विषय ठरली आहे, ती CamScanner या चिनी अ‍ॅपच्या वापरामुळे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सोमु वीर्राजू यांची नियुक्ती केली. त्यांच्या नियुक्तीचं पत्र सोशल मीडियावर टाकण्यात आलं. मात्र हे पत्र CamScanner या चिनी अ‍ॅपनं Scan केलेलं आहे.

या पत्राच्या शेवटी तसा उल्लेखही दिसून येतो. ही चूक नेटकऱ्यांनी लक्षात आणूण देताच भाजपानं ट्विट डिलीट केलं. मात्र, तोपर्यंत CamScanner या चिनी अ‍ॅपनं Scan केलेलं हे पत्र सगळीकडे व्हायरल झालं होतं. सध्या ट्विटरवर भाजपाला यावरून ट्रोल केलं जात आहे.

एक नेटकऱ्यांनं असं म्हटलं आहे की, “CamScanner या चिनी अ‍ॅपवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. पण सत्ताधारी पार्टीच त्याचा कार्यालयीन कामासाठी वापर करत आहे. त्यांनी हे अ‍ॅप काढून टाकलेलं नाही.” तर एकानं AdobeScan वापरण्याचा सल्ला दिला आहे.

“भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाज हुसेन यांनी हे ट्विट डिलीट केलं आहे. पण मला खात्री नाही की त्यांनी हे चिनी अ‍ॅपही त्यांच्या फोनमधून डिलीट केलं असेल.”

या पत्रामुळे ट्विटरवर नेटकऱ्यांनी भाजपावर निशाणा साधला असून, टीकेबरोबरच सल्लेही दिले जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 9:17 am

Web Title: bjp trolled by netizens after using chinese ban app bmh 90
Next Stories
1 …आणि भारतीयांनी मागितली Lund University ची माफी
2 …आणि पंतप्रधान मोदींनी मजुराच्या मुलाशी फोनवरुन साधला संवाद
3 लॉट्रीमध्ये ‘तो’ १६५ कोटी जिंकला ; मात्र एका खास कारणासाठी अर्धा हिस्सा मित्राला दिला
Just Now!
X