मान्सूनचं आगमन होताच मुंबईत ९ जूनपासून पावसाने कहर केला. सलग तीन ते चार दिवस पाऊस कोसळत होता. पहिल्याच पावसाने मुंबई तुंबली. मुंबईकरांना दरवर्षीप्रमाणे समस्यांना तोंड द्यावं लागलं. सलग तीन-चार दिवसांपासून सुरू असलेला पाऊस थांबला आणि मुंबईची चर्चाही. पण रविवारी समोर आलेल्या एका व्हिडीओनं सगळ्यांनाच धक्का दिला. पार्किंगमध्ये उभी असलेली कार बघता बघता बुडाली आणि या व्हिडीओनं देशाचं लक्ष वेधून घेतलं. तर नेटकऱ्याना मीम्ससाठी नवीन विषय मिळाला आहे.

शनिवारी दुपारपासून पावसाने उसंत घेतली. त्यामुळे मुंबई पुन्हा पूर्वपदावर येऊ लागली. सर्व सुसळीत होत असताना घाटकोपर परिसरात असलेल्या एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कार राष्ट्रीय बातमीचा विषय ठरली. घाटकोपर पश्चिममधील कामा लेन येथे असलेल्या रामनिवास या जुन्या सोसायटीत असलेली विहिरीवर सोसायटीने सिमेंटचं छत तयार करून झाकलेली होती व त्यावर सोसायटीतील रहिवाशी वाहनं पार्क करीत असत. मात्र, तीन-चार दिवस झालेल्या पावसामुळे या विहिरीवरील सिमेंट छत खचले. यावेळी इथे पार्क करण्यात आलेली पंकज मेहता यांची कार विहिरीत बुडाली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणि सगळ्यांचच चर्चेचा विषय ठरला आहे.

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral
newly wedded wife calls her husband aho viral video
बायकोची ‘ती’ हाक ऐकताच लाजली ‘अहों’ची स्वारी! सासरची मंडळीही खुदकन हसली; पाहा Video
How to restrict WhatsApp media downloads
‘गुड मॉर्निंग’च्या फोटोने गॅलरी फुल? WhatsApp सेटिंगमधील ‘हा’ एक बदल करील तुम्हाला मदत; पाहा टिप्स….

सोसायटी ५० फूट खोल विहीर आहे. कपाऊंडच्या आतच असलेली ही विहीर शंभर वर्ष जुनी आहे. त्यामुळे सिमेंटच्या साहाय्याने तिच्या छत तयार करून ती झाकली होती. या जागेचा वापर सोसायटीच्या पार्किंगसाठी केला जातो, असं सोसायटीतील रहिवाशांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेनं काम सुरू केलं आहे. विहिरीतील पाणी उपसलं जात असून, त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने ही कार बाहेर काढली जाणार आहे. सुदैवाने या घटनेत कुणाचाही मृत्यू झालेला नाही. संबंधित विभागाला विहिरीतील पाणी उपसण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्याने माध्यमांना दिली.

काँग्रेसची महापालिकेवर टीका

या घटनेवरून काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मुंबई महापालिका आणि अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला आहे. निरुपम घटनेचा व्हिडीओ ट्विट केला आणि “अद्भूत! मुंबईतील घाटकोपर परिसरात हळूहळू बुडत असलेली कार… मुंबईतील नागरी सुविधा कशा पद्धतीने रसातळाला चालल्या आहेत, याचंच हे एक उदाहरण आहे. बृहन्मुंबई महापालिकेनं प्रसिद्धीतून वेळ मिळाल्यास याकडेही लक्ष द्यावं,” असा टोला निरुपम यांनी लगावला आहे.

या घटनेनंतर ट्विटरवर घाटकोपर हा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे. या घटनेवर आता मीम्स व्हायरल होतं आहे. तर काहीजणांनी मीम्सच्या माध्यमातून महापालिकेवर टीकाही केली आहे.

घाटकोपरकर आता उशीर झाला

कारचा मालक येऊन बघतो आणि म्हणतो कार तर इथेच पार्क केली होती

कार पार्किंगचा अनुभव सांगताना मुंबईकर

हेही वाचा- दहा दिवसांतच महिन्याभराचा पाऊस

मालकाचा निरोप घेताना कार

मुंबईकरांना नियम समजावून सांगताना महापालिका

मुंबईत पाऊस कमी, तरीही रस्ते पाण्यात

मुंबईत शनिवारी तुलनेने कमी पाऊस होऊनही अनेक भागांत पाणी तुंबले आणि मुंबईचा वेग मंदावला. रेल्वे रूळांवर पाणी साचल्याने मध्य, हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. तर दादर, शीव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर पाणी तुंबल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. पहाटेपासून सुरू असलेली मुसळधार आणि दुपारी समुद्रास आलेली भरती यामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने मुंबईकरांचे हाल झाले.