सोशल नेटवर्किंगवर सध्या एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दुचाकीवरुन जाणारा व्यक्ती डोंगरावरुन खाली आलेल्या मातीच्या ढीगाऱ्याखाली गाडला जाण्यापासून कशाप्रकारे वाचतो हे दिसत आहे. हा व्हिडिओ इंडोनेशियामधील असून ही घटना एप्रिल महिन्यात घडली आहे. तेव्हापासून अनेकदा हा व्हिडिओ व्हायरल झालेले आहे. हा व्हिडिओ सध्या व्हॉट्सअपवर व्हायरल होत असून काही जण ही घटना गोव्यात घडल्याचे सांगत आहेत. तर काही जणांनी महिन्याभरापूर्वी हाच व्हिडिओ मेघालयमध्ये घडल्याचे सांगत फॉरवर्ड केला होता.

नक्की पाहा >> Video: झुडपांमध्ये जोडप्याचे सुरू होते अश्लील चाळे, संतापलेल्या आजीबाई आल्या आणि…

मेट्रो टीव्ही न्यूजच्या वृत्तानुसार दरड कोसळण्याची झाल्याची घटना ९ एप्रिल रोजी इंडोनेशियामधील चिआंगगजुर आणि सुकानागारा या दोन शहरांना जोडणाऱ्या रस्त्यावर घडली होती. या व्हिडिओमध्ये एक दुचाकीस्वार रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या डोंगरावरील मातीचा ढीगारा खाली येण्याच्या काही सेकंदआधी तेथून निघून जाताना दिसतो. मात्र त्याच्या मागून येणारी व्यक्तीही अशाच प्रयत्न असताना मातीचा ढीगारा रस्त्यावर येतो. त्यामुळे ही व्यक्ती आपली दुचाकी वळवून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आणते. मात्र मातीचा ढीगारा खाली येण्याचा वेग जास्तच असल्याचे पाहून ही व्यक्ती दुचाकी सोडून सुरक्षित जागी पळ काढताना दिसते. वेळीच पळ काढल्याने ही व्यक्ती वाचते मात्र त्याची दुचाकी मातीच्या ढीगाऱ्याखाली गाडली जाते.

नक्की पाहा >> Video : जंगलामध्ये सेल्फी काढत असतानाच मागून अस्वल आलं आणि…

नंदीनी नवाच्या महिलेने १९ जुलै रोजी हा व्हिडिओ ट्विटवरुन शेअर केला आहे. “कसला थोड्यात वाचला आहे हा दुचाकीस्वार,” अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे.

मागील तीन दिवसांमध्ये या व्हिडिओला ३० हजारच्या आसपास व्ह्यूज मिळाले आहेत.