News Flash

Viral : कॉपीला आळा घालण्यासाठी चिनी शिक्षकांनी शोधला रामबाण उपाय

कॉपी करताना सापडल्यास ७ वर्षांचा तुरूंगवास

अमेरिकेतील विविध विद्यापीठात शिकाणारे जवळपाळ ८ हजार चीनी विद्यार्थी कॉपी करण्याच्या प्रकरणात सापडले होते.

काही महिन्यांत दहावी, बारावीच्या परिक्षाला सुरूवात होईल. आता शाळा, कॉलेजमध्ये परिक्षेला कॉपी करण्याचा प्रयत्न अनेक विद्यार्थी करतात. मग उत्तराच्या चिठ्ठ्या लपवून आणणे, अदृश्य शाईने मजकूर लिहून ठेवणे असे अनेक प्रकार विद्यार्थी करतात. एव्हाना शिक्षकांनाही विद्यार्थ्यांचे हे फंडे माहिती झाले आहेत. मग शिक्षकांचे लक्ष नसताना आजूबाजूला बसणा-या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेत डोकावून पाहणे असेही प्रकार सर्रास पाहायला मिळतात. यावर उपाय म्हणून चीनच्या शिक्षकांनी रामबाण उपाय शोधून काढले. येथे विद्यार्थ्यांच्या दोन्ही कानाजवळ पेपर लावले जातात. विद्यार्थ्यांनी आजूबाजूला पाहू नये यासाठी ही शक्कल. त्यामुळे चीनच्या परिक्षा कक्षातले असे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

VIRAL VIDEO : नो पार्किंगमध्ये गाडी पार्क करणा-या चालकास सफाई कर्मचा-याने शिकवला धडा

इतकेच नाही तर चीनमधल्या काही शाळांमध्ये तर विद्यार्थ्यांवर परिक्षेच्या काळात लक्ष ठेवता यावे यासाठी त्यांना मोठ्या मैदानतही बसवले जाते. गेल्याच वर्षी चीनमध्ये एक नवा कायदा करण्यात आला. यानुसार परिक्षेत कॉपी करणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. यात पकडल्या जाणा-या विद्यार्थ्यांना ७ वर्षांपर्यंतचा तुरूंगवासाची शिक्षा आहे. चीनी मुलांमधील कॉपी करण्याच्या वाईट प्रवृत्तीवर आळा बसण्यासाठी हा उपाय चीनने योजला आहे. काही दिवसांपूर्वी एक सर्व्हेक्षण प्रकाशित करण्यात आले होते. यात चीनी मुले कॉपी करण्यात आघाडीवर असल्याचे म्हटले होते. अमेरिकेतील विविध विद्यापीठात शिकाणारे जवळपाळ ८ हजार चीनी विद्यार्थी कॉपी करण्याच्या प्रकरणात सापडले होते.

Viral Video : मेघालयच्या मुख्यमंत्र्यांची विरोधकांसोबत सांगितिक जुगलबंदी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 12:24 pm

Web Title: chinese teacher found unique solution for cheating in exam
Next Stories
1 Viral Video : मेघालयच्या मुख्यमंत्र्यांची विरोधकांसोबत सांगितिक जुगलबंदी
2 VIRAL VIDEO : टीव्ही बघून कुत्र्यालाही नाचण्याचा मोह अनावर
3 मगरीसोबत सेल्फी काढण्याचे वेड महिलेला भोवले
Just Now!
X