चॉकलेट आवडत नाही अशी व्यक्ती या जगात क्वचितच पाहायला मिळेल. पण, चॉकलेट प्रेमींसाठी अत्यंत वाईट बातमी आहे. चॉकलेट ज्या फळांच्या बियांपासून तयार केलं जातं त्या कोकोआची झाडं काही वर्षांत पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. बदलतं हवामान आणि ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम या झाडांवर होत असून २०३० किंवा २०५० पर्यंत कोकोआची झाडं पृथ्वीवरून पूर्णपणे नामशेष होतील असं ‘नॅशनल ओशिअॅनिक अँड अॅटमॉसफिरिक अॅडमिनिस्ट्रेशननं’ जाहीर केलेल्या अहवालात म्हटलं आहे.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढत चाललं आहे. पुढच्या तीस वर्षांत तापमान आणखी वाढेल आणि याचा थेट परिणाम कोकोआवरच्या झाडांवर होईल असं यात म्हटलं आहे. कोकोआ वाढण्यासाठी विशिष्ट हवामानाची आवश्यकता असते पण, सध्याची आणि येणाऱ्या काळातली परिस्थिती चॉकलेटच्या वाढीसाठी आणखी बिकट होणार आहे. त्यामुळे चॉकलेटच उत्पन्न प्रमाणापेक्षा जास्त घटणार आहे. या सर्व परिस्थितीमुळे आता सहज उपलब्ध होणार चॉकलेट २०५० पर्यंत फार कमी प्रमाणात आणि महागड्या किंमतीत उपलब्ध होणारं ‘लक्झरी फूड’ असेल अशी शक्यता अनेकांनी वर्तवली आहे.