‘फेक न्यूज’ हा जगभरात सर्वाधिक चर्चेत राहिलेला शब्द असल्याचं ‘कॉलीन्स’ शब्दकोशानं जाहीर केलं आहे. २०१६ मध्ये ‘ब्रेग्झिट’ हा शब्द जास्त चर्चेत होता, आता ‘फेक न्यूज’ हा शब्द सर्वाधिक वापरला गेल्याचं समोर आलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनीच अनेकदा आपल्या भाषणातून ‘फेक न्यूज’ हा शब्द वापरला. एखादा शब्द वापरण्याच्या सरासरी मर्यादेपेक्षाही ३६५ पटींनी हा शब्द अधिक वापरला गेल्याचं ‘कॉलीन्स’नं म्हटलं आहे.

..अन् ट्विटरच्या कर्मचाऱ्यानं नोकरीच्या शेवटच्या दिवशी ट्रम्पना दिला दणका

‘बातमीच्या नावाखाली खोट्या आणि बऱ्याचदा सनसनाटी माहिती देणं’ अशी ‘फेक न्यूज’ची व्याख्या करण्यात आली आहे. २०१६ मधल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांत माध्यमांनी पक्षपात केला असा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘फेक न्यूज’ हा शब्द अनेकदा प्रयोग केला. या शब्दाची व्याप्ती पाहता त्याला ‘वर्ड ऑफ द इअर’ घोषीत करण्यात आले आहे. ‘फेक न्यूज’ बरोबरच ‘जेंडरफ्लूइड’, ‘फिजेट स्पिनर’, ‘गिग इकोनॉमी’, ‘एंटिफा’ आणि ‘इको-चेंबर’ हे शब्ददेखील सर्वाधिक वापरले गेल्याचंही ‘कॉलीन्स’नं म्हटलं आहे.

Paytm चे नवे फीचर, व्हॉट्सअॅपला मोठा फटका?