News Flash

VIRAL : पतीला धडा शिकण्यासाठी पत्नीने अशी लावली लाखो रुपयांची ‘विल्हेवाट’

याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल

आपल्या खोटारड्या पतीला धडा शिकवण्यासाठी एखादी पत्नी काय करेल? म्हणजे तसे धडा शिकवण्याचे शंभर पर्याय तिच्यापुढे असतील, तेव्हा त्याच्या चुकीला योग्य शिक्षा काय हे ती बरोबर ठरवेल. म्हणजे अबोला धरणं, स्वयंपाक न करणं, आदळआपट करणं, माहेरी जाणं किंवा लाटणं बाहेर काढणं एकापेक्षा एक ‘शस्त्र’ ती बाहेर काढेल. पण आपल्या खोटारड्या पतीला धडा शिकवण्यासाठी एका महिलेने असं काही केलं की ज्याची कल्पनाही कोणी स्वप्नात केली नसेल. या महिलेने चक्क पतीने बचत केलेली सारी रक्कम रागात गिळून टाकली. हे वाचून कदाचित तुम्हीही म्हणाल कसं शक्य आहे हे? पण हे खरं असून कोलंबियामध्ये हा प्रकार घडलाय.

इथल्या सँड्रा अल्मेडा या २८ वर्षीय महिलेने पतीला धडा शिकवण्यासाठी त्याने जमवलेली ७ हजार डॉलर म्हणजे जवळपास चार लाखांहूनही अधिक रक्कम गिळली. सँड्राला फसवून तिने आणि स्वत:ने जमवलेले पैसे घेऊन पळून जाण्याच्या बेतात तिचा नवरा होता. जेव्हा ही गोष्ट तिला कळली तेव्हा तिने त्याचे पैसे शब्दश: खाल्ले. पण झालं उलटच, नवऱ्याला धडा शिकवणं राहिलं बाजूलाच इतक्या अतिरेकीपणामुळे तिच्यावरच रुग्णालयात भरती होण्याची वेळ आली. नोटा गिळल्याने तिला पोटदुखीचा त्रास सुरू झाला. तिला सँटाडेअर हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागेल, जेव्हा डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली तेव्हा डॉक्टरांनी जे काही पाहिले त्यावर त्यांनाच विश्वास बसेना तिच्या पोटात त्यांना ५७ हून अधिक नोटा आढळल्या. मग पुढे काय प्रकार झाला हे डॉक्टरांच्याही लक्षात आले. डॉक्टरांनी या नोटा पोलिसांच्या ताब्यात दिल्या. हे प्रकरण आता न्यायालयात जाणार आहे तेव्हा या पैशांचं नक्की काय करायचं हे न्यायाधीशच ठरवणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 11:52 am

Web Title: colombian wife swallowed the stash of cash
Next Stories
1 Viral : मोदीजी माझं लग्न लावून द्या! प्रियकराने मागितली मोदींकडे मदत
2 राजस्थानचे शेतकरी अॅमेझॉनवर विकतायेत गोवऱ्या
3 VIRAL VIDEO: ८ वर्षांच्या लहानग्याने रचला विश्वविक्रम
Just Now!
X