सध्या सोशल मीडियावर #CoupleChallenge ट्रेण्ड होत आहे. हा चॅलेंज स्वीकारत नेटकरी आपल्या जोडीदारासोबतचा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत आहेत. पण याबद्दल सावधगिरी बाळगण्याचा इशारा पोलीस देत आहेत. हा चॅलेंज नेमका काय आहे आणि त्याबद्दल पोलीस काय म्हणतायत, ते पाहा…
कपल चॅलेंज अंतर्गत रविवारपर्यंत तब्बल ३७ हजारहून अधिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. हा आकडा केवळ इन्स्टाग्रामचा आहे. कपल चॅलेंज हा हॅशटॅग वापरून गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड किंवा पती-पत्नीसोबतचे फोटो पोस्ट केले जात आहेत. काहींनी हास्यास्पद मीम्सदेखील पोस्ट केले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 28, 2020 5:39 pm