05 April 2020

News Flash

COVID-19 : T20 World Cup जिंकवून देणारा क्रिकेटपटू बजावतोय पोलिसाचं कर्तव्य

करोनापासून करतोय जनतेचं रक्षण

करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास लाखभर लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे.

CoronaVirus : लॉकडाउनच्या निर्णयाचे विराटकडून समर्थन; हरभजननेही दिला महत्त्वाचा सल्ला

करोनाचं संकट उद्भवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा देशाला संबोधित करत मोठी घोषणा केली. करोना व्हायरसमुळे जगभरात सर्व काही लॉकडाऊन होत आहे. करोनाचा क्रीडा क्षेत्रालाही फटका बसला असून सर्व क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे सदैव व्यस्त असणारे जगभरातील क्रीडापटू घरात बसून आहेत. अगदी स्टार क्रिकेटपटूही घरातच वेळ घालवत आहे. असे असताना एक माजी क्रिकेटपटू मात्र आपले पोलिसाचे कर्तव्य बजावताना दिसतो आहे. थेट रस्त्यावर उतरुन तो करोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत लोकांची मदत करतो आहे.

२००७ साली भारताने टी २० विश्वचषक जिंकला. त्या विश्वचषकातील स्टार खेळाडू ठरलेला आणि सध्या पोलीस असलेला तो क्रिकेटपटू म्हणजेच जोगिंदर शर्मा. २००७ क्रिकेट विश्वचषकात भारताकडून निर्णायक अंतिम षटक टाकत त्याने भारताला विजय मिळवून दिला होता. जोगिंदर सध्या हरयाणा पोलीसमध्ये डीवायएसपी पदावर आहे. लोकांनी घरात थांबावे यासाठी तो स्वत: रस्त्यावर उतरला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर लोकांनी घरात राहणे हाच यावर एकमेव उपाय असल्याचे तो सांगतो आहे.

“पोलिसांना सहकार्य करा. आपण सगळे एकजुटीने या कोरोनावर विजय मिळवूया. म्हणूनच कोणी घराबाहेर पडू नका”, असा संदेश त्याने दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 10:49 am

Web Title: covid 19 team india cricketer joginder sharma joins battle against coronavirus outbreak as he works in police duty vjb 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 Yamaha ची जबरदस्त Majesty S 155 स्कूटर , जाणून घ्या खासियत
2 Redmi ने आणला टेबिल टेनिसच्या बोर्डऐवढा Smart TV, वाचा किती आहे किंमत?
3 भारतीय लष्कर अशा प्रकारे करते हँड सॅनेटायझिंग, सोशल मीडियावर व्हिडओ व्हायरल
Just Now!
X