News Flash

बाईक स्टंट तर खूप पाहिलेत; पण ट्रॅक्टर स्टंट कधी पाहिलाय?

भेटा ट्रॅक्टर 'स्टंटमॅन'ला

१ टन वजनाचा ट्रॅक्टर घेऊन तो विलीही मारतो.

आतापर्यंत गाड्या, बाईक्स घेऊन स्टंट करणारे स्टंटमन तुम्ही पाहिले असतील. पण कधी १ टन वजनाचा ट्रॅक्टर घेऊन स्टंट करणारा स्टंटमॅन पाहिलात का? मग या पंजाबी तरुणाला पाहा. पंजाबमध्ये ‘ट्रॅक्टर स्टंटमॅन’ नावानं तो प्रसिद्ध आहे. त्याचा स्टंट पाहण्यासाठी खास दूरुन लोक त्याच्या गावात येतात.

गाग्गी बन्सारा असं त्याचं नाव असून तो फक्त २१ वर्षांचा आहे. शिक्षणाला आधीच रामराम ठोकलेला गाग्गी आपल्या वडिलांच्या शेतात काम करतो. शेतात ट्रॅक्टर चालवताना त्याला स्टंट करण्याची कल्पना सुचली. सुरूवातीला त्याचे स्टंट फसलेही. पण काहीतरी वेगळं करण्याचा नाद त्याला काही केल्या स्वस्थ बसू देईना! जवळपास ४ वर्षे मेहनत घेतल्यानंतर तो स्टंट करण्यात निपुण झाला.

वाचा : या फोटोला ‘अप्रतिम’ म्हणताय?, त्याआधी सत्य तरी जाणून घ्या!

विशेष म्हणजे १ टन वजनाचा ट्रॅक्टर घेऊन तो ‘विली’ही मारतो. मागच्या दोन चाकांवर ट्रॅक्टरचा संपूर्ण भार लिलया पेलत तो असे काही स्टंट करतो की सगळेच पाहत बसतात. मोठ्या कौशल्याने तो ट्रॅक्टर चालवतो. याआधी कोणीही ट्रॅक्टर चालवत स्टंट केले नव्हते, त्यामुळे काहीतरी हटके करून ओळख निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला असून सोशल मीडियावर त्याचे स्टंट करतानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तो चांगलाच प्रसिद्ध झालाय.

वाचा : एकेकाळी रस्त्यावर झोपणारा ‘तो’ तरुण आज कोट्यवधीचा मालक!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 10:32 am

Web Title: daredevil farmer performs stunts on tractor
Next Stories
1 इतका सुंदर पांढरा जिराफ तुम्ही नक्कीच पाहिला नसेल!
2 मोदींच्या गुजरातमध्ये तिरंग्याचा अपमान; फोटो सोशल मीडियावर व्हायरल
3 १०० कोटींची संपत्ती, ३ वर्षांच्या मुलीला सोडून ‘हे’ दाम्पत्य घेणार संन्यास!
Just Now!
X