28 September 2020

News Flash

‘श्वान’दार… आणि लावलं सिंहाला पिटाळून, पहा Video

गुजरातमधील गीर अभयारण्यात सिंहासोबत श्वानने दोन हात केल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे

गुजरातमधील गीर अभयारण्यात सिंहासोबत श्वानने दोन हात केल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. श्वानच्या धाडसाचे कौतुक नेटीझन्स करत आहेत. या श्वानचं धाडस बघून नेटकऱ्यांनी देखील आश्चर्याने तोंडात बोटं घातली आहेत, तसेच श्वानचं नशीब बलवान होतं म्हणून या सिंहाशी केलेल्या लढाईत वाचला असंही लोक म्हणत आहेत.

दोन दिवसांपूर्वी गीर अभयारण्यात सिंहाने श्वानवर हल्ल्याच्या उद्देशानं झडप घातली. मात्र श्वाननेही हार न मानता सिंहाचा प्रतिकार केला. श्वानचा प्रतिहल्ला यशस्वी झाल्यानं सिंहाला कुत्र्याची शिकार करता आली नाही. अखेरीस श्वान आणि सिंह आपापल्या वाटेनं निघून गेले.

या व्हिडीओमध्ये सिंह जंगलातल्या झाडांपाशी झोपलेला असताना शेजारून एक श्वान जाताना दिसतोय. सिंह आपल्या पंजानी वार करत असताना श्वाननेही पळून जाण्याऐवजीची पलटवार करताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2019 1:58 pm

Web Title: dog fight lion in gir gujrat
Next Stories
1 1 रुपयात खरेदी करा 24 कॅरेट सोनं, Paytm ची भन्नाट ऑफर
2 थायलंडच्या राजाने केलं महिला बॉडीगार्डशी लग्न
3 वाह! रोनाल्डोच्या ताफ्यात जगातील सर्वात महागडी कार
Just Now!
X