News Flash

रस्त्यावर शौचास बसलेल्या व्यक्तीसोबत नगरसेवकाचा सेल्फी

असंख्य लोक उघड्यावरच प्रात:विधी उरकतात

सेल्फीमुळे हैदराबादमधले नगरसेवक सामा तिरुमल रेड्डी हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

रस्त्यावर शौचास बसलेल्या व्यक्तीसोबत सेल्फी काढून तो व्हायरल करणारे हैदराबादमधले नगरसेवक सामा तिरुमल रेड्डी हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. उघड्यावर शौचास बसण्यापासून लोकांना परावृत्त करावं यासाठी आपण सेल्फी काढला असं रेड्डी यांचं म्हणणं आहे. एकिकडे देशात स्वच्छ भारत अभियान राबवलं जातं, गावं हागणदारीमुक्त व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे असंख्य लोक उघड्यावरच प्रात:विधी उरकत आहे, तेव्हा लोकांना स्वत:ची लाज वाटावी म्हणून मी प्रयत्न करत असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

२२ वर्षांपासून वाळूच्या किल्ल्यात राहणाऱ्या ‘राजा’ला पाहिलात का?

येथील हायकोर्ट कॉलनी परिसरात अनेक मोठे ट्रक उभे असतात. या ट्रकचे चालक याच परिसरात उघड्यावर प्रात:विधी उरकतात. या परिसरातील पार्किंगमध्ये जवळपास २०० ट्रक उभे असतात. चालकांच्या उघड्यावर शौच करण्यामुळे इथल्या लोकांना त्याचा त्रास होतो. चालकांना उघड्यावर शौच करण्यापासून परिसरातील लोकांना वारंवार मज्जाव केला. त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी सुलभ शौचालयं ही बांधण्यात आली आहेत पण, हे चालक त्याचा वापर न करता उघड्यावर शौच करतात अशी तक्रार नागरिकांनी नगरसेवकांकडे केली. त्यामुळे हे प्रकरण आपल्यापरिनं निस्तरण्यासाठी नगरसेवक रेड्डी यांनी उघड्यावर शौचास बसलेल्या तरुणासोबत सेल्फी काढला.

Video : काश्मिरी तरुणाचा जीवावर बेतणारा स्टंट व्हायरल

‘रस्त्यावर शौचालयं बांधण्यात आली आहेत, इतकंच नाही तर पेट्रोल पंपावरदेखील शौचालयं बांधण्यात आली, पण याचा वापर न करता हे चालक बिंधास्त उघड्यावर शौचास बसतात. या चालकासोबत सेल्फी काढून त्याची बदमानी करण्याचा माझा उद्देश नव्हता. अशी चूक त्यानं भविष्यात करु नये यासाठी मी सेल्फी काढला असं स्पष्टीकरण देत रेड्डी यांनी आपली बाजू उचलून धरली. पण उघड्यावर शौच करण्यापासून लोकांना परावृत्त करण्याचा हा मार्ग असूच शकत नाही असं सांगत लोकांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 1:54 pm

Web Title: driver who defecating in the open
Next Stories
1 Video : फोनची बॅटरी तरुणाच्या तोंडात फुटली
2 Video : काश्मिरी तरुणाचा जीवावर बेतणारा स्टंट व्हायरल
3 Viral Video : या मुलाला एक काय दहा सुट्ट्या द्या! असा रजेचा अर्ज तुम्ही पाहिला नसेल
Just Now!
X