05 December 2020

News Flash

मानवी मेंदूत कॉम्प्युटर चीप बसवण्यासाठी मस्क यांच्या स्टार्टअपचे संशोधन, ‘या’ आजारातून होऊ शकते सुटका

डुक्कराच्या मेंदूमध्ये मागच्या दोन महिन्यांपासून छोटया नाण्याच्या आकाराची कॉम्प्युटर चीप बसवलेली होती.

मानवी मेंदूशी निगडीत असलेल्या आजारांमधून रुग्णाला पूर्णपणे बरे करण्यासाठी इलॉन मस्क यांची न्युरालिंक ही न्युरोसायन्स स्टार्टअप कंपनी ही एक नवीन टेक्नोलॉजी विकसित करत आहे. या न्युरालिंकने शुक्रवारी एक डुक्कर सर्वांसमोर आणले. या डुक्कराच्या मेंदूमध्ये मागच्या दोन महिन्यांपासून छोटया नाण्याच्या आकाराची कॉम्प्युटर चीप बसवलेली होती.

चीप इम्प्लान्ट तंत्रज्ञान हे मानवी आजार बरे करण्याच्या लक्ष्याच्या दिशेने एक प्रारंभीचे पाऊल आहे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये २०१६ साली मस्क यांनी न्युरालिंकची स्थापना केली. चीपच्या माध्यमातून मानवी मेंदूमध्ये वायरलेस कॉम्प्युटर बसवण्याचा न्युरालिंकचा उद्देश आहे. स्पायनल कॉर्डच्या दुखापती, डिमेंशिया, अल्झायमर या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना बरे होण्यासाठी मदत करणे हे न्युरालिंकचे लक्ष्य आहे. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.

ही चीप म्हणजे मानवी शरीरातील एक प्रकारची कृत्रिम बुद्धिमत्ता असेल. शुक्रवारी वेबकास्टमध्ये बोलताना मस्क यांनी स्मृतिभ्रंश, नैराश्य आणि इंसोमेनिया या आजारांचा उल्लेख केला. इम्प्लांटेबल उपकरणांमुळे वास्तवात या समस्यांचे निराकरण होऊ शकते असे मस्क म्हणाले. ‘पैसा जमवणे हा आमचा हेतू नाही. महान व्यक्तींनी न्युरालिंकमध्ये येऊन काम करावे, यासाठी प्रयत्न करत आहोत’ असे मस्क म्हणाले.

इलॉक मस्क हे सतत नावीन्याचा शोध घेण्यासाठी ओळखले जातात. त्यांची टेस्ला कंपनी इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करण्यासाठी ओळखली जाते. त्याशिवाय स्पेसएक्सच्या माध्यमातून त्यांनी अवकाश संशोधन क्षेत्रातही ठसा उमटवला आहे. वाहतुकीचा वेगवान पर्याय देणारे हायपरलूप तंत्रज्ञानही त्यांनी विकसित केले आहे. अमेरिकेत हायपरपूलच्या अनेक यशस्वी चाचण्या झाल्या आहेत. हायपरलूपमुळे काही मिनिटात एका शहरातून दुसऱ्या शहरात पोहोचता येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2020 9:39 am

Web Title: elon musks neuralink venture unveils pig with computer chip in brain dmp 82
Next Stories
1 सिंहीणींच्या हल्ल्यात पर्यावरण संरक्षकाचा मृत्यू; पत्नीसमोर घडली धक्कादायक घटना
2 आदित्य ठाकरेंनी ‘ओळख पुसली’ अन् आलं चर्चांना उधाण
3 एकाच शेळीवर दोघांचा दावा, अखेर त्या मुक्या प्राण्यानेच लावला प्रकरणाचा छडा
Just Now!
X