मोबाईलची बॅटरी दातानं दाबून ती तपासणं एका व्यक्तीला भलतच महागात पडलं आहे. अशा पद्धतीनं बॅटरी तपासण्यामुळे या तरुणाच्या तोंडात बॅटरीचा स्फोट झाला आहे. ही आयफोनची बनावट बॅटरी असल्याचं समजत आहे. आयफोनची लीथियम बॅटरी मोबाईल युजर्सला सहज काढता येत नाही. ही बॅटरी काढण्यासाठी वेगळे टेक्नेशिअन असतात. संबधीत तरुण हा ती बॅटरी खरी आहे की बनवाट हे तपासून पाहात होता. यासाठी त्यानं ही बॅटरी तोंडात पकडून दातानं तिचा चावा घेण्याचा प्रयत्न केला पण, यात बॅटरीचा स्फोट झाला. सुदैवानं संबधित तरुणाला फक्त किरकोळ जखम झाली.

Video : काश्मिरी तरुणाचा जीवावर बेतणारा स्टंट व्हायरल

वाचा : २२ वर्षांपासून वाळूच्या किल्ल्यात राहणाऱ्या ‘राजा’ला पाहिलात का?

‘डेली मेल’च्या माहितीनुसार चीनमध्ये आयफोनला मोठी मागणी आहे. पण, त्याचबरोबर आयफोनच्या बनावट बॅटरीचं मार्केटही मोठं आहे. त्यामुळे दातानं दाबून बॅटरी तपासण्याची येथे पद्धत आहे. या बॅटरीचा स्फोट होण्यामागचं कारण काय हे मात्र समजू शकलं नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यामुळे अशाप्रकारे बॅटरी तपासून न पाहाण्याचं आवाहन ग्राहकांना करण्यात आलं आहे.