जगातील नामांकित कंपन्यांपैकी एक असलेली अॅपल कंपनी आपल्या पहिल्या वहिल्या अॅपल १ या कॉम्प्युटरचा लिलाव करत आहे. हा कॉम्प्युटर १९७० मध्ये तयार करण्यात आला होता. तो स्वत: स्टीव जॉब्स आणि स्टीव वोज्नियाक यांनी मिळून बनवला होता. विशेष म्हणजे तेव्हा हा कॉम्प्युटर ४६ हजार रुपयांना विकला गेला होता. हाच लॅपटॉप आता लिलावासाठी काढण्यात आला असून एक नामांकित लिलाव कंपनी त्याचा सप्टेंबरमध्ये लिलाव करणार आहे. या लॅपटॉपची किंमत ३ लाख डॉलर म्हणजेच जवळपास २ करोड रुपये इतकी ठरविण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे हा कॉम्प्युटर आजही चालू स्थितीत आहे.
१९७६ ते ७७ या कालावधीत जॉब्स आणि वोज्नियाक यांनी साधारण २०० कॉम्प्युटर बनवले. त्यातील आता ६० कॉम्प्युटर चालू अवस्थेत आहेत. लिलाव करण्यात येणाऱ्या पहिल्या कॉम्प्युटरमधील सर्व पार्टस ओरिजनल असल्याचेही अॅपलकडून सांगण्यात आले आहे. या कॉम्प्युटरचे टेस्टींग करत असताना तो ८ तासांसाठी चालविण्यात आला आणि त्यात कोणताही अडथळा आला नाही. याचा किबोर्डही पहिल्यांदा लावण्यात आलेला तोच आहे. हा अॅपल १ कॉम्प्युटर बनविल्यानंतर जॉब्स आणि वोज्नियाक यांना बरेच नाव आणि पैसाही मिळाला. त्यामुळे इतक्या वर्षानंतर आता हा कॉम्प्युटर किती किंमतीला विकला जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कॉम्प्युटर १ च्या निर्मितीनंतर कंपनीने अॅपल २ हा कॉम्प्युटर बनवला. त्याचेही मोठ्या प्रमाणात उत्पादनही करण्यात आले. त्यानंतरही कंपनीने आपले अपग्रेडेड अनेक कॉम्प्युटर बनविले. सध्या अॅपल लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि मोबाईलसाठी एक आघाडीची कंपनी म्हणून ओळखली जाते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 28, 2018 12:35 pm