जागतिक उद्योजक शिखर परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्प भारतात आली आहे. तिच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून तिच्या सुरक्षेचीही खास व्यवस्था करण्यात आली आहे. यूनायटेड स्टेट्स सीक्रेट सर्व्हिसचे जवान तिच्या सुरक्षेसाठी सज्ज आहेत. इतकंच नाही तर ती येणार म्हणून हैदराबाद शहरात भिकाऱ्यांवरही बंदी घालण्यात आली आहे.

Viral Video : पोलिसांनी नाट्यमयरित्या तिला ट्रेनखाली येण्यापासून वाचवलं

शिखर परिषदेनंतर सरकारकडून तिच्यासाठी खास शाही मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. जगातल्या सर्वात मोठ्या डायनिंग हॉलमध्ये इव्हांकासाठी साग्रसंगीत बेत आखण्यात आला आहे. ताज फलकनुमा पॅलेस या ठिकाणी हा मेजवानी समारंभ पार पडणार आहे. पण, इव्हांका ही आपल्या आरोग्याबद्दल अधिक जागरुक असल्यानं तिच्यासाठी लज्जतदार पदार्थ तयार करताना विशेष काळजी घेण्यात येणार आहे. शेफ साजेश नायर यांच्या देखरेखीखाली तिच्यासाठी खास हैदराबादी खाद्यपदार्थ तयार करण्यात येणार आहेत. ‘हिंदुस्थान टाइम्स’नं दिलेल्या माहितीनुसार जेवण तयार करताना चंदन, अंजीर आणि केसर यांचा वापर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कबाब, कोफ्ता, कुल्फी यासारख्या अनेक शाही हैदराबादी पदार्थांचा समावेश या मेजवानीत करण्यात येणार आहे.

‘गाढव’पणा! पोलिसांनी चक्क गाढवांना तुरुंगात धाडलं

इव्हांका ही ट्रम्प यांची मुलगी असली तरी ती राष्ट्राध्यक्षांची सल्लागारही आहे. यापूर्वी तिने यशस्वी उद्योजिका म्हणूनही नावलौकिक कमावला होता. इव्हांकाचा स्वत:चा फॅशन ब्रॅण्ड आहे. या ब्रॅण्डचे कपडे, चप्पल, हॅण्डबॅग, दागिने अमेरिकेत लोकप्रिय आहेत.