News Flash

बापरे… ‘उडणारा’ साप!; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा प्रश्न, ‘२०२० आणखीन काय काय दाखवणार?’

हा व्हिडिओ पाहून अनेकांनी नोंदवल्या प्रतिक्रिया

Photo: Twitter/nypost

साप असं म्हटलं तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. सापाच्या विशिष्ट प्रजातीच विषारी असतात तरी अनेकांना सापांची भिती वाटते. अनेकदा याच भितीमुळे सापांचा नाहक जीव घेतला जातो. अनेकदा साप चावल्याच्या भितीनेच रुग्ण दगावल्याचेही आपण वाचतो. चित्रपट, मालिकांमध्येही साप आणि नाग हा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. अगदी नाग आणि नागीन किंवा सापांवर आधारित अनेक चित्रपट आपल्याला पहायला मिळतात. यामुळेच सापांबद्दल अनेकांना आजही कुतूहल आहे. सापाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. मात्र सापाबद्दल नुकतीच समोर आलेली एक माहिती पाहून भीतीने अनेकांची गाळण उडाली आहे.

तुम्हालाही कदाचित ठाऊक नसेल पण फ्लाइंग स्केन्स म्हणजेच उडणारे साप अस्तित्वात आहेत. नाही या सापांना पंख नसतात मात्र त्यांची उडी मारण्याची क्षमात ही अफाट असल्याने त्यांना फ्लाइंग स्केन असं म्हटल जातं. आग्नेय आशियामध्ये सापडणारे तीन फुट लांबीचे काही साप हे एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर ४० किमी प्रती तास वेगाने उडी मारु शकतात असं नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनामध्ये दिसून आलं आहे.

नक्की वाचा >> ‘मोगली किधर है बगीरा?’; दुर्मिळ ब्लॅक पँथरच्या दर्शनानंतर नेटकऱ्यांना आठवलं जंगल बूक

लवचिक शरीर असल्याने हे साप इतक्या लांब आणि सहज उडी मारु शकता असं संशोधक म्हणतात. हे साप एका झाड्याच्या शेंड्यावरुन दुसऱ्या झाडाच्या शेंड्यावर उड्या मारतात असं दिसून आलं आहे. मात्र हे साप एवढ्या लांब अंतरावर उडी कशी मारतात या मागील कोडं उद्याप संशोधकांनाही उडगडलेलं नाही. यासंदर्भात अद्पाही संशोधन सुरु आहे. मात्र या संशोधनादरम्यानचा एक व्हिडिओ सीएनएनने पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये साप उडी मारण्यासंदर्भातील संशोधन कसं केलं जातं हे संशोधक समजून सांगताना दिसत आहे.

मात्र वैज्ञानिकांना या सापाच्या उडीमागील रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता असतानाच दुसरीकडे नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून पुन्हा एकदा सन २०२० हे खूपच भयानक असल्याचे मत व्यक्त केलं आहे. भूकंप, करोना महामारी, वादळे, पूर असं सगळं झाल्यावर आता हीच बातमी ऐकायचं बाकी होतं असं अनेकांनी म्हटलं आहे. पाहुयात अशाच काही मजेशीर प्रतिक्रिया…

घ्या सापही उडू लागलेत आता

एवढचं ऐकायचं बाकी होतं

हे या आधीही होतं की?

अजून काय बाकी आहे २०२० मध्ये

अरे काय हे…

एकंदरितच या सर्व प्रतिक्रियांवरुन २०२० च्या यादीमध्ये आणखीन एका भितीदायक गोष्टीची भर पडल्याचं नेटकऱ्यांच म्हणणं आहे हेच दिसून येत आहे. व्हर्जनिया टेक विद्यापिठातील संशोधकांनी या सापांवर केलेलं संशोधन नेचर फिजिक्स या मासिकामध्ये छापून आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 2:14 pm

Web Title: flying snakes and people connect it with year 2020 scsg 91
Next Stories
1 PUBG चा नाद लागला नातवाला, पण दोन लाखांचा फटका बसला आजोबांना
2 “बार्बेक्यू व बीअरपेक्षा आयुष्य अधिक महत्वाचं”; पूल पार्ट्यांवर डॉक्टर संतापले
3 रोज सूर्याएवढा तारा गिळंकृत करणारं कृष्णविवर सापडलं; वैज्ञानिक म्हणतात, “आपल्याजवळ असतं तर…”
Just Now!
X