जगावर करोना संकट ओढावल्यामुळे गरिबांपासून श्रीमंतापर्यंत आणि कलाकारांपासून उद्योगपतीपर्यंत सर्वच जण मदतीला सरसावले आहेत. कोणी गरिंबाच्या खाण्यापिण्यासाठी तर कोणी डॉक्टरांच्या मदतीला धावले आहेत. तर कोणी आपल्या परिने आर्थिक मदत पोहचवत आहेत. करोनावर मात करण्यासाठी मानसिक आधारासोबतच सर्वाधिक महत्त्वाच्या अशा आर्थिक आधारासाठीही आता अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. नेहमी जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असणाऱ्या धनाढ्य व्यक्तींनीही गलेलठ्ठ मदत केली आहे. विशेष म्हणजे जगातील अव्वल दहा दानशूर व्यक्तीमध्ये फक्त एका भारतीयाचा समावेश आहे. ज्यामध्ये विप्रोच्या अझीम प्रेमजी यांच्यापासून ट्विरच्या सीईओ अर्थात कार्यकारी संचालक पदी असणाऱ्या जॅक डॉर्सी यांचा सामावेश आहे.

विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी १३.२ कोटी युएस डॉलर्स इतकी आर्थिक मदत करत, सर्वाधिक आर्थिक सहाय्य करणाऱ्यांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. सर्वाधिक मदत ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी १०० कोटी यूएस डॉलरची मदत केली आहे. एकीकडे जगातील अव्वल दहा दानशूरांमध्ये अझीम प्रेमजी यांचं एकमेव नाव असल्यामुले सोशल मीडियावर अंबानी आणि अडाणीसारख्या भारतातील श्रीमंत उद्योगपतीवर टीका केली जात आहे. पाहूयात जगातील अव्वल दहा दानशूर व्यक्ती…

जॅक डॉर्सी- १०० कोटी कोटी युएस डॉलर्स

बिल आणि मेलिंडा गेट्स – २५.५ कोटी युएस डॉलर्स

अझीम प्रेमजी – १३.२ कोटी युएस डॉलर्स

जॉर्ज सोरोस – १३ कोटी युएस डॉलर्स

जेफ बेजोस- १० कोटी युएस डॉलर्स

जेफरी स्कोल- दहा कोटी यू एस डॉलर्स

एँड्य्रू फॉरेस्ट – १० कोटी युएस डॉलर्स

मायकल डेल – १० कोटी युएस डॉलर्स

मायकल ब्लूमबर्ग – ७.४५ कोटी यूएस डॉलर्स