दरवर्षी किमान दहा ते बारा उल्का पृथ्वीजवळून जात असतात. त्यातील एक-दोन उल्का वगळता इतर उल्का धोकादायक नसतात. आजपर्यंत पृथ्वीवर सुमारे १५० उल्का पडून सरोवर निर्माण झाले आहेत. अजूनही काही उल्का पृथ्वीच्या सभोवती प्रदक्षिणा घालत आहेत. त्यापैकी काही अत्यंत धोकादायक श्रेणीत येतात. आज आकाशात उल्कांचा पाऊस पडणार आहे. गुगलने नेहमीप्रमाणे उल्काचे शानदार डुडल काढले आहे. गुगलने डुडलद्वारे उल्कावृष्टीचा शानदार नजराना सादर केला आहे.

अवकाशातून पृथ्वीवर येऊन कोसळणाऱ्या घन पदार्थाला उल्का (मिटिऑर) असं म्हणतात. तिचा कोसळण्याचा वेग घर्षण निर्माण करतो आणि तो घन पदार्थ चमकतो. बहुतेक उल्कापातांची नोंद अशा पडताना दिसण्यातून आणि लगेच जमिनीवर पडलेल्या गोळा करण्यातून होत असते. अशा प्रकारच्या नोंदींना ‘फॉल’ असं म्हणतात. उल्का कोसळल्यावर मात्र ती बरीचशी दगडासारखीच दिसते म्हणून तिला उल्कापाषाण किंवा अशनी असं संबोधलं जातं. असे उल्कापाषाण उल्कापातावेळी पडताना दिसले नाहीत पण ते नंतर जमिनीवर सापडले तर त्या उल्कापाताच्या नोंदीस ‘फाइंड’ असं म्हणतात.

प्रत्येकवर्षी आकाशात होणाऱ्या उल्कांच्या वर्षावाचा सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. आज १३ डिसेंबर २०१८ रोजी मध्यरात्री आकाशात उल्कांचा (Meteor) वर्षाव दिसणार आहेत. उल्कांच्या (Meteor) वर्षावाला ‘जेमिनिड मीटियोर शॉवर’ म्हटले जाते. उल्कांचा वर्षाव पाहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला शहरापासून दूर जावे लागेल. प्रत्येकवर्षी डिसेंबर महिन्यात उल्कावृष्टी होते. Phaethon मधील एस्ट्रॉयडमुळे उल्कावृष्टी होते. वातावरण ठिक असेल तर आज उल्कांचा वर्षाव व्यवस्थीत पाहता येईल. ढगाळ वातावरण असल्यास उल्का पाहता येणार नाहीत. उल्का पाहण्यासाठी डेलिस्कोप किंवा बहायोकुलरची गरज भासणार नाही. रात्री ९ नंतर तुम्ही उल्कांचा वर्षाव पाहू शकता.


२०१६-१७ वर्षी १३ धोकादायक उल्का पृथ्वीजवळून गेल्या होत्या. महाराष्ट्रातील लोणार येथे मोठी उल्का पडल्याने त्यावेळी मोठा विनाश झाला होता. आजही पृथ्वीवर १५० उल्का पडल्याच्या खुणा विवरांच्या रूपाने पाहायला मिळतात. सर्वसामान्यपणे आतापावेतो आढळलेल्या उल्कापाषाणात (सुमारे ९४%) ‘खडकाळ’ (२३ल्ल८) गुणधर्माचे उल्कापाषाणच असतात. यात मुख्यत्वेकरून सुमारे ७५-९० % गारगोटी आणि १०-२५% निकेल-लोखंड मिश्रधातू आढळतो. या प्रकारातही दोन उपजाती आहेत. (१) कॉन्ड्राईट् – यात चुना आणि अ‍ॅल्युमिनियमचा अंश इतर खनिजांसोबत आढळतो. हा दगडातील सर्वात प्राचीन प्रकार जो अद्याप त्याचे गुणधर्म टिकवून आहे. काटोल येथे झालेल्या उल्कापातात याच प्रकारच्या उल्कापाषाणांचा वर्षांव झाल्याचं दिसतं. (२) अकॉन्ड्राईट् – या प्रकारचे उल्कापाषाण वेगळ्या लघुग्रहांवरचे असतात. घन पदार्थाच्या एखाद्या टकरीमुळे वितळलेला लाव्हा वेगाने बाहेर पडून पुन: गोठला जाऊन हे तयार होतात. साध्या नजरेला त्यांच्यात आणि पृथ्वीवरच्या खडकात फरक करता येत नाही म्हणून त्यांचा शोध तितकासा सोपा नसतो.