सध्या बकरीच्या करामतीचा एक व्हिडिओ फेसबुकवर चांगलाच फिरत आहे. नारळाच्या झाडावर अगदी पटकन चढणा-याला देखील लाजवले असा हा व्हिडिओ आहे. हिंदीत म्हण आहे बघा ‘आसमान से टपके और खजुर पे अटके’ तसेच या बकरीचेही झाले आहे. खाण्याच्या शोधात ही बकरी चक्क खजूराच्या झाडावर चढली पण खाली कसे यायचे हे मात्र तिला कळले नाही त्यामुळे कितीतरी वेळ या बकरीची अशीच अवस्था झाली होती.
‘नॅशनल जिओग्राफीने’ देखील युट्युबवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. खजुराचे झाड हे जवळपास ७० ते ७५ फूट उंच असतात. तसेच या झाडाला फांद्याही नसतात त्यामुळे सरळ झाडावर ही बकरी चढली तरी कशी असा प्रश्न सगळ्यांना पडला. ही बकरी आपल्या चार पायांनी कशी बशी वर पोहचली पण उतरताना मात्र तिची चांगलीच नाचक्की झाली. खजूर खाण्याच्या लालसेपोटी तिने तिथेपर्यंत पोहचण्याचा मार्ग शोधला पण उतरताना मात्र ती तिथेच अडकून राहिली. आतापर्यंत पाल्याच्या शोधात झाडाचे टोक गाठणा-या बक-यांचे व्हिडिओ ब-याचदा पाहायला मिळतात. पण निदान त्या झाडांच्या फांद्यांचा आधार घेऊन वर चढतात आणि खाली उतरतात पण या बकरीच्या अशा अजब कर्तबीने मात्र सगळ्यांना आर्श्चयात टाकले.