News Flash

Play Store वरील कोणतं App आहे सर्वोत्तम? गुगलने जाहीर केली यादी

प्ले स्टोरवरील सर्वोत्तम अ‍ॅप्स , गेम्स, चित्रपट, पुस्तके, टीव्ही शो यांची यादी जाहीर

गुगलने दरवर्षीप्रमाणे या वर्षातील प्ले स्टोरवरील सर्वोत्तम अ‍ॅप्स , गेम्स, चित्रपट, पुस्तके, टीव्ही शो यांची यादी जाहीर केली आहे. याशिवाय गुगलकडून प्रथमच ‘फॅन फेव्हरेट’ विभागसुद्धा करण्यात आला असून यामध्ये यूजर्सच्या वोटिंगद्वारे विजेता ठरविण्यात आला आहे. ही यादी गुगलने प्ले-स्टोरवर जाहीर केली आहे.

गेम्सच्या श्रेणीमध्ये अपेक्षेप्रमाणे Call Of Duty: Mobile हा बेस्ट गेम ठरला आहे. याशिवाय कंपनीने Ablo अ‍ॅप (Ablo: Talk to new people & explore the world : Best App of 2019 on Google Play) सर्वोत्तम असल्याचं सांगितलं आहे. प्ले-स्टोरच्या एडिटर्सकडून या अ‍ॅपची निवड करण्याच आली आहे. या अ‍ॅपद्वारे तुम्ही जगभरातील मित्रांशी तुमच्या भाषेत संवाद साधू शकतात. तर, 2019 मधील युजर्सना सर्वाधिक आवडलेलं अ‍ॅप Spotify : Listen to your favourite music & podcasts : Users’ Choice App of 2019 आहे. स्पॉटिफाय हे गाणी, संगीत ऐकण्यासाठी लोकप्रिय अ‍ॅप असून जगभरातील कंटेंट या अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे.

बेस्ट पर्सनल ग्रोथ अ‍ॅप्स  ऑफ 2019 श्रेणीमध्ये Meesho अ‍ॅप सर्वोत्तम ठरलंय. या अ‍ॅपमध्ये ऑनलाइन पैसे कमावण्याचे पर्याय सांगितले जातात. ‘बेस्ट हिडेन जेम्स ऑफ 2019’ या श्रेणीमध्ये Apply Weather बेस्ट अ‍ॅप ठरलंय. तर, चित्रपट प्रकारात avengers endgame ने बाजी मारली आहे. ही संपूर्ण यादी आणि विजेते तुम्ही प्ले-स्टोरवर जाऊन पाहू शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 5:13 pm

Web Title: google play store best android apps of 2019 sas 89
Next Stories
1 मोबाईल दरवाढीचं नो टेंशन, ‘या’ युजर्सना नाही मोजावे लागणार अतिरिक्त पैसे
2 मांजर मेली, ‘नासा’ने वाहिली श्रद्धांजली; इंटरनेटवर अश्रूंचा पूर
3 सुंदर पिचाईंचं प्रमोशन, एकाचवेळी दोन कंपन्यांचे CEO बनण्याची साधली किमया
Just Now!
X