काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वढेरा यांनी स्वत:च्या फेसबुक पेजवर भारतीय रेल्वेचा एका व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये रेल्वेच्या इंजिनवर अदानी कंपनीची जाहिरात दिसत होती. कंपनीचे नाव असणारं स्टीकर इंजिनच्या दरवाजाजवळ लावण्यात आल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. त्यांनी पोस्ट केलेला हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर आता सरकारने त्यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.

नक्की पाहा >> मोदी सरकारच्या काळात अदानींच्या २१ कंपन्यांना मंजूरी; जाणून घ्या Adani Agri Logistics आहे तरी काय?

प्रियंका गांधींनी मागील सोमवारी त्यांच्या फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला या व्हिडीओसोबत प्रियंका यांनी लिहिलेल्या डिस्क्रीप्शनमध्ये, “ज्या भारतीय रेल्वेला देशातील कोट्यावधी लोकांनी आपल्या मेहनतीने बनवलं भाजपा सरकारने त्यावर आपल्या अब्जाधीश मित्र अडानी यांचा शिक्का मारला. उद्या हळूहळू रेल्वेचा एक मोठा हिस्सा मोदीजींच्या अब्जाधीश मित्रांना देण्यात येईल. देशात शेतकरी शेती व्यवसायही आज मोदींच्या अब्जाधीश मित्रांच्या हाती जाण्यापासून रोखण्यासाठी लढाई लढत आहेत,” असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ साडेसहा हजारांहून अधिक जणांनी शेअर केला.

नक्की वाचा >> शेतकरी आंदोलन : “मोदी कोणीची चौकीदारी करतात?, अदानी-अंबानींची की शेतकऱ्यांची?”

मात्र आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर थेट केंद्र सरकारच्या पत्रसूचना विभागालानेच (पीआयबी) याबद्दल खुलासा केला आहे. व्हायरल होणाऱ्या खोट्या बातम्याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी पीआयबीने ‘पीआय़बी फॅक्ट चेक’ नावाने एक ट्विटर अकाऊंट सुरु केलं आहे. या अकाऊंटवरुन व्हायरल होणाऱ्या बातम्यांची सत्यता पताळून त्यासंदर्भात थेट सरकारकडूनच स्पष्टीकरण दिलं जातं. याच ट्विटर हॅण्डलवरुन प्रियंका यांनी केलेला दावा चुकीचा असल्याचं सांगण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> “अंबानींना टेलीकॉम, अदानींना एअरपोर्ट्स अन् शेतकऱ्यांवर लाठीचार्ज; मोदी है तो मुमकीन है”

फेसबुकवर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये भारत सरकारने भारतीय रेल्वेवर एका खासगी कंपनीचा शिक्का मारल्याचा दावा केला जात आहे. मात्र पीआयबी फॅक्टचेकमध्ये हा दावा खोटा असल्याची माहिती समोर आली आहे, असं पीआयबीने म्हटलं आहे. ही केवळ एक जाहिरात असून तिकीटांव्यक्तिरिक्त रेल्वेचा महसूल वाढवण्याच्या उद्देशाने ती करण्यात आली आहे, असंही पीआयबीने म्हटलं आहे.

तुम्हालाही अशाप्रकारचा एखादा व्हिडीओ किंवा सरकारी योजनेचा मेसेज आल्यास पीआयबीच्या फॅक्ट चेकच्या साईटवर म्हणजेच https://factcheck.pib.gov.in/ वर तुम्ही त्याची सत्यता पडताळून पाहू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही व्हॉट्सअपवरुन +91 8799 7112 59 या क्रमांकावर अथवा pibfactcheck@gmail.com या ईमेल आयडी वरुन माहितीची सत्यता पडताळून घेऊ शकता. ही माहिती  https://pib.gov.in वरही उपलब्ध आहे.

नक्की वाचा >> “शेतकऱ्यांनाही मोदी, शाह यांच्यासारखे मध्यस्थ नकोय ते थेट अंबानी, अदानींशी बोलतील”