20 October 2020

News Flash

धावणं हा धर्म असलेल्या हिमाच्या जातीत भारतीयांना स्वारस्य

ट्विटरवर नेटीझन्सचा हल्लाबोल

ती एका लहानशा गावातून आलेली…धावणं हाच तिचा धर्म…नुकतंच तिने सुवर्णपदक पटकावत देशाची मान उंच होईल अशी कामगिरी केली…मात्र तिच्याबाबत माहिती शोधताना भारतीयांना तिच्या जातीतच जास्त स्वारस्य असल्याचे नुकतेच लक्षात आले आहे. या मुलीचे नाव आहे हिमा दास. आसाममधील नागाव या गावी राहणाऱ्या या तरुणीने आपल्या कामगिरीने भारतीयांची मने जिंकली. मात्र इतकी उंची कामगिरी करुनही तिच्या कामगिरीबाबत सर्च न करता भारतीय लोक गुगलवर तिची जात शोधण्यात स्वारस्य मानत आहेत. त्यामुळे भारतीयांची पुरातन मानसिकता पुन्हा एकदा समोर आली आहे.

हिमा दासबाबतच्या सर्चमध्ये गुगलवर तिची जात सर्वाधिक शोधला जात असल्याचे समजत आहे. या सर्चवरुन ट्विटरवर जोरदार चर्चा सुरु आहे. अनेकांनी भारतीय मानसिकतेबाबत आपला राग व्यक्त केला आहे. भारत एक दु:खी देश आहे, तिची जात सर्च होणे ही खेदाची बाब आहे, तिची कामगिरी न पाहता जात कशी शोधू शकतात असे प्रश्न नेटीझन्सनी सोशल मीडियावर विचारले आहेत. लाखांमध्ये लोकांनी तिची जात सर्च केल्याचे गुगल दाखवत आहे. त्यामुळे तिच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असताना तिची जात सर्वाधिक सर्च होणे ही अतिशय खेदाची गोष्ट आहे असे म्हणावे लागले.

Next Stories
1 नोटाबंदीच्या काळातला ओव्हरटाइम परत करा – स्टेट बँकेचे 70 हजार कर्मचाऱ्यांना फर्मान
2 ऑलिम्पिकच्या तयारीसाठी हिमा दासला आनंद महिंद्रा देणार आधार
3 दहशतवादी संघटनेत भरती होण्यासाठी गेलेला तो आपल्या गाण्याने जिंकतोय सर्वांची मनं
Just Now!
X