19 January 2021

News Flash

यापैकी किती भारतीयांची नावं तुम्हाला माहितीये? महिंद्रांचा प्रश्न; बरोबर उत्तर देणाऱ्यास मिळणार ‘खास गिफ्ट’

यापैकी किती भारतीयांची नावं तुम्हाला माहितीये?

देशातील दिग्गज उद्योजक आणि महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर नेहमीच सक्रिय असतात. लोकांशी निगडीत निरनिराळ्या पोस्ट ते शेअर करत असतात. नेहमी मजेशीर ट्विट्स करत असल्याने त्यांची फॅन फॉलोइंगही मोठ्या प्रमाणात आहे. यावेळी आनंद महिंद्रांनी काही फोटो ट्विट केले आहेत, आणि बरोबर उत्तर देणाऱ्याला ‘जावा बाइक जॅकेट’ गिफ्ट म्हणून देण्याची घोषणा केली आहे.

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकणाऱ्या कमला हॅरिस, ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषि सुनक, आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ या आणि अशा इतर अनेक भारतीय वंशाच्या व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कार्यामुळे जगात चर्चेत आहेत. जगभरात भारताचं नाव मोठं करणाऱ्या अशाच १२ व्यक्तींचे फोटो महिंद्रा यांनी रविवारी ट्विट केले. “१२ व्यक्तींपैकी किती जणांची नावं तुम्ही सांगू शकता? पहिलं बरोबर उत्तर देणाऱ्या एकाला जावा बाइक जॅकेट (यूनिसेक्स) मिळेल. विजेत्याची घोषणा उद्या होईल”, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलंय.


महिंद्रा यांनी हे ट्विट करताच युजर्सनी त्याखाली उत्तरं देण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, आज(दि.१२) महिंद्रा विजेत्याची घोषणा करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2020 10:04 am

Web Title: how many of these 12 indian origin international icons can you name anand mahindra has a reward waiting for you sas 89
Next Stories
1 आली लहर केला कहर! बर्गर खाण्यासाठी बूक केलं चक्क हेलिकॉप्टर
2 Shocking Video : वृद्ध महिलेच्या अंगावरून गेला ट्रक, नंतर…; अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ व्हायरल
3 …म्हणून करोनाबाधित कर्मचाऱ्याने HR विभागातील अधिकाऱ्याचं घेतलं चुंबन
Just Now!
X