WhatsApp नव्या वर्षात अनेक दमदार फीचर्स आणायच्या तयारीत आहे. हे फीचर्स आतापर्यंत कधी iOS तर कधी Android च्या बीटा व्हर्जनमध्ये पाहण्यात आलेत. WhatsApp चे फीचर्स ट्रॅक करणाऱ्या WABetaInfo ने सातत्याने नवे फीचर्स स्पॉट केलेत. WhatsApp मध्ये नव्या वर्षात डिसअ‍ॅपिरिंग मेसेज Disappearing Messages हे फीचर येणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. या फीचरमुळे WhatsApp वापरण्याच्या पद्धतीत मोठा बदल होईल, हे फीचर नव्या वर्षातील व्हॉट्सअ‍ॅपचं सर्वात मोठं फीचर असल्याचं सांगितलं जात आहे. या नव्या फीचरद्वारे, युजरने सेंड किंवा रिसिव्ह केलेले मेसेज ठरवलेल्या वेळेनंतर ‘गायब’ होतील. हे फीचर सुरूवातीला केवळ ग्रुप अ‍ॅडमिन वापरु शकतील असं सांगितलं जातंय. याशिवाय डार्क मोड, फेस अनलॉक, लास्ट सीन फॉर सिलेक्टेड फ्रेंड्स आणि फेसबुक पे यांसारखे अनेक फीचर्सही येणार आहेत.

(नवे फीचर अशाप्रकारे असण्याची शक्यता)

मेसेज डिलिट करण्याचे सहा पर्याय –
हे फीचर ऑक्टोबर महिन्यात अँड्रॉइड अ‍ॅप (v2.19.275) च्या बीटा व्हर्जनमध्ये Disappearing Messages नावाने स्पॉट झालं होतं. यानंतर नोव्हेंबरमध्ये हे फीचर डिलिट मेसेज (Delete Messages)या स्वरुपात बीटा व्हर्जनमध्ये (2.19.348) दिसलं होतं. दोन्हीवेळेस हे फीचर केवळ ग्रुप चॅट्स (Group Chats)साठी कार्यरत असल्याचं आणि केवळ ग्रुपच्या अ‍ॅड्मिनकडेच ते वापरण्याचे अधिकार असल्याचं लक्षात आलं. काही रिपोर्ट्सनुसार, Delete Messages हा पर्याय ग्रुप सेटिंग्समध्ये असेल. यामध्ये एडिट ग्रुप इंफो, सेंड मेसेज आणि एडिट ग्रुप अ‍ॅडमिन्स यांसारखे पर्याय असतील. एखादा मेसेज किती वेळाने आपोआप डिलिट व्हावा याचे अधिकार केवळ अ‍ॅडमिनलाच असतील. या फीचरबाबत आतापर्यंत जे स्क्रीनशॉट्स समोर आलेत त्यानुसार, मेसेज डिलिट करण्यासाठी 6 पर्याय (ऑफ, 1 तास, 1 दिवस, 1 आठवडा, 1 महिना आणि 1 वर्ष) मिळतील. तर, ऑक्टोबर अपडेटमध्ये पाच सेकंद किंवा एक तासाचा पर्याय मिळेल.

आणखी वाचा – ‘डार्क मोड’ ते ‘फेस अनलॉक’पर्यंत, पुढील वर्षी WhatsApp मध्ये येणार हे फीचर्स

अँड्रॉइडसह iOS युजर्सनाही मिळणार नवं फीचर –
लेटेस्ट अपडेटनुसार मेसेज डिलिट करण्यासाठी अ‍ॅडमिन जो पर्याय निवडेल तो ग्रुपमधील सर्व सदस्यांना लागू असेल. म्हणजे एखाद्या खास युजरसाठी डिलिट करण्याची वेगळी वेळ ठरवता येणार नाही. सध्या हे फीचर केवळ अँड्रॉइड बीटा अपडेटमध्येच दिसले आहे, मात्र iOS युजर्सनाही हे फीचर मिळेल असं म्हटलं जातंय.