इंडिगो एअरलाईन्स एका व्हिडिओमुळे यावेळीही चर्चेत आली आहे. पण हा व्हिडिओ एका प्रवाशाला मारहाण करतानाच नसून एका एअर होस्टेसचा आहे. ही एअरहोस्टेस विमानतळावरून बाहेर निघत असताना दोन मुलांनी तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. विमानतळावर उभ्या असलेल्या पोलिसांना तिने ही बाब लक्षात आणून दिली आणि पोलिसांनी या दोन्ही मुलांना अटक केली. छेडछाडीसाठी पोलीस आपल्याला अटक करतील याची कल्पनाच त्यांनी केली नव्हती, शेवटी स्वत:च्या सुटकेसाठी एअर होस्टेसच्या हाता-पाया पडून ते तक्रार दाखल नकरण्यासाठी तिच्या मिनतवाऱ्या करू लागले.

एका हातात बाळ, दुसऱ्या हातात गन; धाडसी पोलिसाने केला दरोडेखोरांचा खात्मा

हैदराबादमध्ये इंडिओ एअरलाईन्सची एअर होस्टेस उतरली होती. यावेळी विमानतळावर भरत आणि कल्याण नावाच्या मुलांनी तिची छेड काढली. या दोघांना अद्दल घडवण्यासाठी तिनं या दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलीस ठाण्यात आणल्यावर हे दोघंही तिच्या हाता-पाया पडून माफी मागू लागले. पोलिसांदेखतच या तरूणाने तिच्या पायावर लोळण घेत आपल्या चुकीसाठी माफी मागितली. कल्याण आणि भरत या दोघांनी मद्यप्राशन केलं असल्याचं तिच्या लक्षात आलं, हे दोघंही विद्यार्थी आहेत आणि आपल्या तक्रारीमुळे कदाचित त्यांना अडचणी येऊ शकतील हे लक्षात घेऊन तिने मोठ्या मनाने या दोघांना माफ केलं.

VIRAL: फळ विक्रेत्यांकडून अशाप्रकारे होतेय ग्राहकांची फसवणूक

‘दोन मुलांना पोलीस ठाण्यात आणल्यावर त्यांनी आमच्या महिला कर्मचाऱ्याची माफी मागितली आहे. त्यांच्या माफीनंतर तिने पोलिसांत तक्रार नोंदवली नाही. गैरवर्तणूकीसाठी या दोघांनाही पोलिसांनी काही काळासाठी तुरूंगात ठेवले, नंतर त्यांना सोडून देण्यात आलं’ असं इंडिगोनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. दरम्यान या दोन्ही तरुणांचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.