News Flash

Video : ‘हिटमॅन’च्या रॅपवर युवराजचा डान्स, मुंबईच्या विजयानंतर धमाकेदार सेलिब्रेशन

आयपीएलचे जेतेपद पटकावल्यानंतर रोहित शर्माचा आनंद गगनात मावेनासा होता.

'मुंबई इंडियन्स'ने ट्विटरवर शेअर केला व्हिडिओ

मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघावर एका धावेने मात करून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. आयपीएलमध्ये सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माचे नाव आघाडीवर आहे. रोहित शर्माचं कर्णधार म्हणून हे चौथं विजेतेपद ठरलं. त्यामुळे विजयाचं सेलिब्रेशनसुद्धा दणक्यात झालं. सामना संपल्यानंतर हिटमॅन रोहितनं रॅप साँग म्हटलं तर युवराज सिंगने डान्स करत त्याला साथ दिली. मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

या व्हिडिओत रोहित शर्मा ‘गली बॉय’ चित्रपटातील रॅप साँग गाताना तर युवराज त्यावर ठेका धरताना दिसतोय. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनीही रोहितवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

आयपीएलचे जेतेपद पटकावल्यावर रोहित शर्माचा आनंद गगनात मावेनासा होता. सामना संपल्यावर रोहित आपल्या लाडक्या लेकीकडे गेला आणि तिच्यासोबत विजयाचा आनंद साजरा केला.

यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने २०१३, २०१५, २०१७ मध्ये आयपीएल चषक आपल्या नावे केलं होतं. त्यानंतर आता २०१९ मध्येही मुंबईने बाजी मारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2019 2:54 pm

Web Title: ipl 2019 celebration after mumbai indians win hitman rohit sharma rap song and yuvraj singh dance
टॅग : IPL 2019
Next Stories
1 IPL 2019: मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर व्हायरल झालेले मीम्स पाहिलेत का?
2 IPL 2019 : नीता अंबानींचा मंत्रजप, सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया
3 पिवळ्या साडीनंतर आता निळ्या ड्रेसमधल्या निवडणूक अधिकाऱ्याची चर्चा !
Just Now!
X