News Flash

न्यूटनच्या पुस्तकाची चक्क १४.४५ कोटी रुपयांना विक्री

आजवर कुठल्याही लिलावात विकण्यात आलेले शास्त्रीय विषयावरील हे सगळ्यात महागडे छापील पुस्तक आहे.

न्यूटनच्या पुस्तकाची चक्क १४.४५ कोटी रुपयांना विक्री

प्रसिद्ध वैज्ञानिक आयझॅक न्यूटन यांच्या गतीविषयक तीन नियमांची माहिती देणाऱ्या पुस्तकाची बांधणीची प्रत (बाऊंड कॉपी) लिलावात १४.४५ कोटी रुपये इतक्या प्रचंड रकमेला विकली गेली आहे. आजवर कुठल्याही लिलावात विकण्यात आलेले शास्त्रीय विषयावरील हे सगळ्यात महागडे छापील पुस्तक आहे.
१६८७ साली लिहिण्यात आलेले ‘प्रिन्सिपिआ मॅथेमॅटिका’ या पुस्तकाचे वर्णन शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांनी ‘आजवर कुठल्याही माणसाने केलेली सगळ्यात मोठी बौद्धिक प्रगती’ असे केले होते. बकऱ्याच्या कातडीने झाकलेल्या या पुस्तकासाठी १० कोटी रुपये इतकी किंमत येईल, अशी ‘ख्रिस्तीज’ या ऑक्शन हाऊसला अपेक्षा होती. परंतु अनपेक्षितपणे या पुस्तकाला १४.४५ कोटी रुपयांना हे पुस्तक विकले गेले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2019 6:14 pm

Web Title: isaac newton masterwork becomes most expensive science book sold
Next Stories
1 आता घराच्या खिडकीवरही पाहू शकतो सिनेमा
2 ‘तेरे भाई जैसा कोई हार्डीच नही है!’, अंबानींमधील भाईचाऱ्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
3 ..म्हणून मतदानानंतर बोटावर लावलेली शाई पुसली जात नाही
Just Now!
X