16 February 2019

News Flash

Video : …म्हणून पाकिस्तानच्या मॉलमधला हा व्हिडिओ होतोय व्हायरल

अवघ्या २ दिवसांत ५५ हजार लोकांनी हा व्हिडियो शेअर केला आहे. तर ३० लाखांहून अधिक जणांनी आतापर्यंत तो पाहीला आहे.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. त्यातही कोणीतरी केलेला डान्स यावर जास्त व्हायरल होतो. कधी एखाद्या अंकलनी लग्नात केलेला डान्स असेल तर कधी इराणमधील एखाद्या महिलेने हिजाब न घालता केलेला डान्स असेल याचे व्हिडियो अगदी काही वेळात या माध्यमात व्हायरल होताना दिसतात. त्याचप्रमाणे डान्सचा आणखी एक व्हिडियो नुकताच व्हायरल झाला आहे. यामध्ये एक व्यक्ती मॉलमध्ये मनसोक्त डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडियो पाकिस्तानमधील असून एका पंजाबी गाण्यावर ही व्यक्ती नाचत असल्याचे या व्हिडियोमध्ये दिसत आहे. पाकिस्तानमध्ये बॉलिवूड चित्रपटांबरोबरच पंजाबी चित्रपटांनाही विशेष पसंती मिळते. तसेच पंजाबी गाण्यांनाही मिळत असलेली पसंती हे याचेच एक उदाहरण आहे.

मन्नत नूर या चित्रपटातील Laung Laachi या गाण्यावर हा व्यक्ती नाचत आहे. या व्यक्तीचे नाव आहे नीरु बाजवा. सोशल मीडियावर या गाण्याने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. मेहरोज बेग नावाच्या व्यक्तीने फेसबुकवर हा डान्सचा व्हिडियो शेअर केला असून अवघ्या २ दिवसांत ५५ हजार लोकांनी हा व्हिडियो शेअर केला आहे. तर ३० लाखांहून अधिक जणांनी आतापर्यंत तो पाहीला आहे. फॉर्मल कपड्यांत डान्स करणाऱ्या या तरुणाला मॉलमध्ये उपस्थित असलेल्यांकडूनही जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे व्हिडियोमधून समजत आहे. अनेकजण शिट्ट्या वाजवून त्याला प्रतिसाद देत आहेत. या गाण्याच्या स्टेप्स हा तरुण इतका नेमक्या करत आहेत की एखाद्या अभिनेत्रीलाही लाजवेल.

First Published on July 10, 2018 7:26 pm

Web Title: laung laachi latest punjabi movie pakistani doing dance in mall video viral