सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड होईल याचा नेम नाही. एकाएकी सोशल मीडियावर पराठा ट्रेंड होऊ सादसेय पराठ्याबाबत सरकारनं तयार केलेल्या नियमांवरून लोकही मजा उडवू लागले आहेत. तर पराठ्याचे चाहत्यांनी तर थेट सरकारवर टीका केली. पराठ्याबाबतच्या नव्या नियमावरू महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनीदेखील फिरकी घेतली आहे.

जीएसटीवर कर्नाटकस्थित अ‍ॅडव्हान्सिटी ऑफ अ‍ॅडव्हान्स रूलिंगनं (एएआर) पराठ्यांवर जीएसटीचा स्लॅब वाढविण्याचा आदेश जारी केला आहे. सामान्यत: पराठा हा चपातीचाच एक प्रकार मानला जातो. ज्या ठिकाणी चपातीवर ५ टक्के जीएसटी आहे. तर दुसरीकडे जीएसटीवर १८ टक्के स्लॅबमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

‘रोटी (१९०५)’ या अंतर्गत येणापी उत्पादनं पहिल्यापासूनच तयार असतात आणि पूर्णपणे शिजवलेले पदार्थ असतात. तर दुसरीकडे पराठा हा खाण्यापूर्वी गरम करणे आवश्यक आहे. या आधारावर पराठ्याचं वर्गीकरण १९०५ अंतर्गत करता येणार नाही. त्यामुळे जीएसटीच्या ९९ ए अंतर्गतही येणार नाही, असं एएआरने आपल्या आदेशात म्हटले आहे.


यावर ट्विट करत आनंद महिंद्रा यांनीदेखील फिरकी घेतली. “देशात सध्या अनेक संकटं आहेत. अशातच पराठ्याच्या अस्तित्वावरही संकट आलं आहे. मला पूर्णपणे भरवसा आहे की जुगाडू वृत्तीतून ‘परोटीस’ (पराठा+रोटी) असा नवा पदार्थ तयार होईल आणि तो कोणत्याही वर्गीकरणाला आव्हान देईल,” अशी प्रतिक्रिया महिंद्रा यांनी दिली.