18 January 2018

News Flash

Viral Video : लॅम्बॉर्गिनीचे नुकसान करणाऱ्या त्या तरूणाला घडली जन्माची अद्दल

खोडकरपणा आला अंगाशी!

मुंबई | Updated: October 12, 2017 4:58 PM

५ कोटीच्या गाडीचं केलं नुकसान

अनेकांसाठी त्यांची दुचाकी किंवा चारचाकी म्हणजे जीव की प्राण असतो. गाडी खूपच महागडी आणि अलिशान असली तर मालक तिला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. आपल्या गाडीला काही होणार तर नाही ना, अशी चिंता त्यांना सतत लागून राहिलेली असते. पण समजा एखाद्या माथेफिरूने गाडीचे नुकसान केले तर मालक काय करेल बरं? साहजिकच असे झाल्यास गाडीचा मालक संबंधित व्यक्तीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

FIFA U17 : गोलकीपर धीरजच्या पालकांचा फुटबॉल खेळण्यास विरोध होता कारण…

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रस्त्यावरच्या एका खोडकर तरुणाने चक्क लॅम्बॉर्गिनीवर चढून गाडीचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या लॅम्बॉर्गिनीच्या बोनेटवर तो चढाला आणि वरच्या भागावर पाय देऊन तो पळून निघून गेला. या तरूणाला अडवण्याचा गाडीच्या चालकाने प्रयत्न केला, पण त्याला चकवा देऊन तो पळून गेला. कहर म्हणजे थोड्याचवेळात हा तरूण तिकडे पुन्हा आला. तो पुन्हा गाडीवर चढायचा प्रयत्न करू लागला. त्यानंतर तो पुन्हा निसटणार तितक्याच गाडीच्या मालकाने त्याला पकडले. त्यानंतर या मालकाने तरूणाला आयुष्यभर लक्षात राहील, असा धडा शिकवला. आता तुम्हीच पाहा भर रस्त्यात रंगलेल्या या हाय व्होल्टेज ड्रामामध्ये नेमकं काय घडलं ते.

Video : सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला तिचा आनंद आणि घट्ट मिठी!

First Published on October 12, 2017 4:58 pm

Web Title: man climbs the roof of rs 5 crore lamborghini
  1. No Comments.