News Flash

Viral Video : अरे देवा ! बॅगेसोबत ‘तो’ ही स्कॅनिंग मशीनमध्ये शिरला

अज्ञानामुळे स्कॅनिंग मशीनमध्ये घेतली उडी

सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक ठिकाणी अनेक उपाययोजना केल्या जातात. आता हेच बघा ना विमानतळापासून मॉलमध्ये, सिनेमाहगृह ते ऑफिस, देऊळ अशा अनेक ठिकाणी स्कॅनिंग मशीन्स बसवल्या आहे. येथे माणसांची तर तपासणी होतेच पण त्यांच्या सामानांची देखील तपासणीही केली जाते. यासाठी वेगळ्या बॅग स्कॅनिंग मशीन्स बसवल्या आहेत. आता आपल्यासारख्या लोकांना याची सवय झाली आहे. त्यामुळे स्कॅनिंग मशीन्स जवळ आल्यावर काय करायचे हे आपल्याला माहित असते.
पण काही लोक असे आहेत की ज्यांना नक्की काय करायचे हेच माहिती नसते, त्यामुळे मशीन्सपाशी आले की ते गडबडून जातात. पण आता सोशल मीडियावर जो व्हिडिओ फिरतो तो म्हणजे या सगळ्यांहूनही कहरच म्हणावा लागेल. ‘Epic LMAO’ या फेसबुक पेजवर एक सीसीटीव्ही फुटेज टाकण्यात आले आहे. हे फुटेज पाहून तुम्ही डोक्यावर हात मारला नाही तर नवलच म्हणावे लागेल. स्कॅनिंग मशीनसमोर आल्यावर नक्की काय करायचे हे माहित नसल्याने या व्यक्तीने असे काही केले ते पाहिल्यावर अनेकांना हसू आवरलेच नाही. हा व्यक्ती स्कॅनिंग मशीनजवळ आला, पण त्याला नेमके काय करायचे होते हेच माहित नव्हते. त्यामुळे तो तसाच चालत पुढे आला पण सुरक्षारक्षकाने त्याला काही सूचना करत पुन्हा स्कॅनिंग मशीनजवळ पाठवले. सुरक्षारक्षकाच्या सुचना लक्षात न अल्याने गोंधळून गेलेल्या या व्यक्तीने चक्क स्कॅनिंग मशीनमध्ये बॅग घेऊन उडी मारली. पण तो ही करामत करत असपर्यंत इतरांना हा प्रकार लक्षात आला नाही. चक्क दुस-या बाजूने मशीनमधून या माणसाला बाहेर आलेले पाहून काही सेकंद सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. नंतर मात्र सगळ्यांनी डोक्यावर हात मारला. हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे हे समजू शकले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 12:48 pm

Web Title: man jumps on scanner along with his bag because he just didnt know what to do
Next Stories
1 शिक्षक दिन का साजरा करतात; सोशल मिडीयावर प्रश्नांचा पाऊस
2 वैज्ञानिकांनी माशाचे ‘बराक ओबामा’ असे केले नामकरण
3 Teacher’s Day 2016 : शिक्षकदिनानिमित्त गुगलचे अनोखे डुडल
Just Now!
X