27 October 2020

News Flash

अबब ! तीन हजार फूट उंचीवर त्यानं प्रेयसीला केलं प्रपोज

प्रपोज करण्यासाठी कोणी काही शक्कल लढवेल सांगता येत नाही. गुडघ्यावर बसून प्रपोज केल्याचं तूम्ही चित्रपटात पाहिले असेलच.

प्रपोज करण्यासाठी कोणी काही शक्कल लढवेल सांगता येत नाही. गुडघ्यावर बसून प्रपोज केल्याचं तूम्ही चित्रपटात पाहिले असेलच. खऱ्याखुऱ्या आयुष्यातही प्रियकर-प्रेयसी आपलं प्रेम एका खास अंदाजात व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून आयुष्यभर आपली प्रेमकथा आठवणीत रहावी, हा प्रयत्न त्यामागील असतो. अशीच हटके प्रेमकथा समोर आली आहे. यामध्ये एका तरूणाने तब्बल तीन हजार फूट उंचीवर प्रेयसीला प्रपोज केलं आहे. त्यांची ही कथा वाचून तुम्हाला नक्कीच आर्श्चय वाटेल.

नॉर्वेतील ३३ वर्षीय क्रिश्चियन रिचर्ड्स या व्यक्तीने जमिनीपासून तीन हजार फूट उंचीवर दोन मोठ्या खडकांच्या मधोमध जाऊन आपल्या प्रेयसीला प्रपोज केलं आहे. खडकाच्या आजूबाजूला पाणीच पाणी आहे. तसेच दोन्ही खडक एका भल्यामोठ्या दगडाने जाडले गेले आहेत. त्या दगडावर उभे राहून रिचर्ड्सने प्रेयसीला प्रपोज केलं. इतका रोमँटिक प्रपोजल पाहून प्रेयसीची काय प्रतिक्रिया असेल याचा अंदाज तुम्ही बांधू शकाल. रिचर्ड्सची प्रेयसी बेक्स मोर्ले हिने हे रोमँटिक प्रपोजल तात्काळ स्वीकारलं. नयनरम्य स्थळ आणि रिचर्ड्सचे प्रेम पाहून बेक्स भावनिक झाली होती.

(रिचर्ड्स आणि बेक्स)

ज्यावेळी रिचर्ड्सने जमिनीपासून ३००० हजार फूट उंचीवर गुडघ्यावर बसून लग्नासाठी प्रपोज केलं. त्यावेळी बेक्स आनंदाश्रू रोखू शकली नाही. त्याच क्षणी तीने आपला होकार असल्याचे त्याला मिठी मारत सांगितले. हे सर्व एखाद्या स्वप्नासारखे असल्याचा भास तिला झाला होता. या हटके प्रपोजलचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘द सन’ या वृत्तपत्राशी बोलताना रिचर्ड्स म्हणाला की, अनेकांना बेक्स माझं प्रपोजल स्वीकारणार नाही असे वाटले होते. मात्र, मला दुसऱ्याच गोष्टीची चिंता पडली होती. ऐवढ्या उंचीवर असताना रिंग हातातून खाली पडू नये याची भिती मला होती, कारण ती रिंग मी पुन्हा शोधू शकलो नसतो.

हे खूप भितीदायक होतो, माझ्यापेक्षा बेक्सला अधिक चिंता होती. माझा पाय घसरून मी पडेल याची भिती बेक्सला सतावत होती. ट्रेकिंगला गेल्यानंतर माझ्या डोक्यात ही आयडिया आल्याचेही रिचर्ड्सने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 12:33 pm

Web Title: man proposed girlfriend on 3000 feet hight between two cliffs nck 90
Next Stories
1 VIDEO: ‘सचिन, द्रविड, लक्ष्मण स्लेजिंग करायचे का?’, गांगुलीने दिले हे मजेदार उत्तर
2 शिमल्यामधील मोदींचे आवडते रेस्टॉरंट झाले बंद, गुलाबजामसाठी होते लोकप्रिय
3 पोटाने ऐनवेळी दगा दिला, आवाज झाला अन् चोर पोलिसांच्या तावडीत सापडला
Just Now!
X