कोणत्याही ठिकाणी जायचं असेल आणि रस्ता माहित नसेल तर सर्वप्रथम विचार येतो तो म्हणजे Google Maps चा. याद्वारे तुमच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा आणि ‘शॉर्टकट’ रस्ता दाखवला जातो. तुम्ही पायी चालत असाल किंवा गाडी चालवत असाल तरी गुगल मॅपद्वारे तुम्ही तुमच्या ठिकाणापर्यंत पोहोचतात. पण, अनेकदा गुगल मॅपवर अतिविश्वास ठेवल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकतात. असाच प्रकार उत्तर अमेरिकेतील एका व्यक्तीसोबत घडलाय.
पाहा फोटो : (देशातील 10 सर्वाधिक Popular Cars , ‘ही’ ठरली बेस्ट ; बघा संपूर्ण यादी)
Google Maps ने दाखवलेल्या रस्त्याने गेल्यामुळे बर्फ गोठलेल्या नदीत जाऊन पडल्याचा दावा उत्तर अमेरिकेतील एका व्यक्तीने केलाय. रात्रीच्या तीन वाजता ही घटना घडली आणि मदतीसाठी आजूबाजूला कोणीही नव्हतं असं त्या व्यक्तीचं म्हणणं आहे. इंग्रजी वेबसाइट autoevolution च्या वृत्तानुसार, मिनीपोलिस शहरातून आलेल्या एका व्यक्तीला त्याच्या हॉटेलचा रस्ता माहित नव्हता. त्यामुळे त्याने गुगल मॅप्सची मदत घेतली.
मॅप्सने दाखवलेला रस्ता मिसिसिपी नदीतून जात होता, पण ती नदी गोठली होती असा या व्यक्तीचा दावा आहे. त्या रस्त्याने गेल्यामुळे तो अचानक पाण्यात पडला. मदतीसाठी आजूबाजूलाही कोणी नव्हतं ,अखेर त्याने स्थानीक अग्निशमन दलाला फोन लावला आणि त्याचा जीव वाचला. नदी पार करण्यासाठी स्टोन आर्क ब्रिजचा वापर करावा असा सल्ला गुगल मॅप्सकडून देण्यात आला असावा, पण त्या व्यक्तीने चुकीचे निर्देश ऐकले असावेत अशी शक्यता बचाव पथकाडून व्यक्त करण्यात आली आहे. पण, गुगल मॅप्समुळे लोकं चुकीच्या ठिकाणी पोहोचल्याच्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. सुदैवाने त्या व्यक्तीची प्रकृती आता ठिक असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.