एखाद्या चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकरीला रामराम ठोकून वेगळेच काहीतरी करण्याची धमक फार कमी लोकांत असते. म्हणूनच हे लोक जगावेगळे असतात. कोणताही अनुभव गाठीशी नसताना दुरवस्था झालेले संग्रहालय संभाळण्यासाठी मध्यप्रदेशमधले रहिवाशी असलेल्या आर.के साहू यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देत २७ वर्षांपूर्वी थेट अहमदाबाद गाठले होते.

वाचा : फक्त भिका-यांनाच देतो ‘हा’ इंजिनिअर नोकरी
वाचा : प्रतिदिन १५ रुपये कमावणारे सुदीप आज १६०० कोटींचे मालक

आर.के साहू यांनी फक्त संग्रहालय सांभाळण्यासाठी आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडली. वयाच्या २६ वर्षी त्यांच्याकडे चांगली नोकरी होती. पण अहमदाबाद येथील प्राणी संग्रहालय सांभाळण्याची संधी त्यांच्यापुढे आली तेव्हा  कोणताही विचार न करता त्यांनी अर्ज केला. अहमदाबाद येथील कंकारीया संग्रहालयचाचे संचालक म्हणून ते गेल्या २७ वर्षांपासून कार्यरत आहेत. एका वृत्तपत्रात त्यांनी या संग्रहालयची जाहिरात पाहिली होती. त्यांची निवड झाली तेव्हा कोणताही अनुभव नसलेले साहू फक्त सहा महिन्यात संग्रहालय सोडून जातील अशी अवहेलना त्यांना अनेकदा सहन करावी लागली. त्यावेळी या संग्रहालयाची दुरवस्था झाली होती. इथल्या प्राण्यांची काळजी घेण्यासाठी येथे पशूवैद्य देखील नव्हता. गेल्या २७ वर्षांपासून अहमदाबादलाच आपले घर मानून साहू यांनी या संग्रहालयाची विशेष काळजी घेत सुधारणा केल्या. आज भारतातील प्रसिद्ध १४ संग्रहालयांपैकी ते एक आहे. त्यांच्या मेहनत आणि चिकाटीची गोष्ट ह्युमन्स ऑफ अहमदाबाद यांनी पुढे आणली.