News Flash

कर्तव्यनिष्ठा… खांद्यावर लसींचा बॉक्स, पाठीवर मुलीला घेऊन नदी ओलांडून ‘ती’ लसीकरणासाठी गावात पोहचली

पावसाळा सुरु झाल्यापासून मागील एका आठवड्यात येथील नद्यांमधील पाण्याच्या पातळीत वाढ झालीय. मात्र पाणी वाढलं असलं तरी तिने आपलं काम थांबवलेलं नाही.

Manti Kumari
सध्या सोशल नेटवर्किंगवर तिच्याच फोटोची चर्चा आहे. (फोटो ट्विटरवरुन साभार)

जगभरामध्ये लसीकरणाची मोहिम सुरु झालीय. देशातील दुर्गम भागांमध्ये जाऊन आरोग्य कर्मचारी लसीकरणाचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक ठिकाणी तर वाहन जाण्याची शक्यता नसल्याने अनेक तास पायी चालतच लसीकरण करण्यासाठी दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहचावं लागत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या खडतर प्रवासाची जाणीव करुन देणारा असाच एक फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक महिला आरोग्य कर्मचारी आपल्या उजव्या खांद्यावर लसीकरणादरम्यान लसी ठेवण्यासाठी येणारा बॉक्स तर पाठीवर लहान बाळाला घेऊन गुडघाभर पाणी असणाऱ्या नदीपात्रातून चालताना दिसत आहे. एका दुर्गम भागातील गावामध्ये लसीकरणासाठी ही माहिला जात आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दिसणाऱ्या महिलेचे नाव मानती कुमारी असं आहे. हीमानती ही चतमा येथील उप आरोग्य केंद्रावर ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचारी म्हणून काम करते. ती तिथे एएनएम (Auxiliary Nurse Midwif) पदावर कामाला आहे. मानती ही करोनाच्या लसीकरणाचं काम करत नसली तरी ती दर महिन्याला अक्सी पंचायतमधील एका गावामध्ये आठवड्यातून एक दिवस मुलांना आवश्यक असणाऱ्या लसी देण्यासाठी जाते. मानती ही झारखंडमधील लातीहार जिल्ह्यातील माहुआधूर येथे काम करत असल्याची माहिती समोर आलीय.

पावसाळा सुरु झाल्यापासून मागील एका आठवड्यात येथील नद्यांमधील पाण्याच्या पातळीत वाढ झालीय. मात्र पाणी वाढलं असलं तरी मानतीने आपलं काम थांबवलेलं नाही. ती आपल्या दीड वर्षाच्या मुलीला घेऊन आजूबाजूच्या गावांमध्ये लहान मुलांचे लसीकरण करण्यासाठी जाते. बुरार नदीमधून जाताना मानतीचा फोटो कोणीतरी क्लिक केला आणि तो आता व्हायरल झालाय. आतापर्यंत मानतीने तीन गावांमधील लहान मुलांचं लसीकरण पूर्ण केलं आहे. मानतीचा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

अनेकांनी मानतीचं कौतुक केलं आहे. अशी लोक करोना संकटाच्या कालावधीमध्ये आशेचे किरण आणि उत्साह वाढवणारी तसेच प्रेरणा देणारी ठरतात, अशा लोकांमुळे माणुसकी आणि साकारात्मकता जिवंत आहे, अशा शब्दामध्ये मानतीवर कौतुकाचा वर्षाव केला जातोय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2021 6:25 pm

Web Title: manti kumari anm for vaccination program for young children photo goes viral on twitter scsg 91
Next Stories
1 राहुल गांधींच्या मागे असलेल्या फोटोची का होतेय चर्चा?; कोण आहे फोटोग्राफर?
2 पुण्यतिथी विशेष : अकबरच्या सैन्याला हुसकावून लावणारी राणी दुर्गावती; जाणून घ्या गोंडवानाच्या राणीची शौर्यगाथा
3 फ्रान्समधील विमानतळावर करण्यात आलं ‘न्यूड चेकिंग’; दक्षिण आफ्रिकन गायिकेचा आरोप
Just Now!
X