माजी पॉर्न स्टार मिया खलिफाने भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला काही दिवसांपूर्वीच पाठिंबा दिला. त्यानंतर अनेक भारतीय सेलिब्रिटिंनी ‘आमच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप नको’ अशा शब्दात तिला प्रत्युत्तर दिलं. त्यावर आता मिया खलिफानेही पुन्हा उत्तर दिलं आहे.

मिया खलिफाने आपल्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती समोसा, गुलाबजाम असे भारतीय पदार्थ खाताना दिसत असून टोमणा मारण्याच्या अंदाजात ‘प्रत्येक गोष्टीची काहीतरी किंमत असते’ असं म्हणतेय.

“बरीच मेहनत केल्यानंतर त्याचा मोबदला भेटल्यावर खूप चांगलं वाटतं. मी देखील आज हे स्वादिष्ट जेवण कमावलंय. माणुसकीच्या नात्याने सोशल मीडियावर सुरू असलेल्या एका मोहिमेमुळे हे स्वादिष्ट जेवण मला मिळालं. माझ्या कामासाठी मला समोसा आणि अन्य सर्व पदार्थ मिळालेत”. असं मिया खलिफा या व्हिडिओत बोलत आहे. सोबतच, खाताना टोमणा मारण्याच्या अंदाजात ‘प्रत्येक गोष्टीची काहीतरी किंमत असते’, असंही ती म्हणते. याशिवाय स्पेशल थाळी पाठवणाऱ्यांचे मिया खलिफाने आभार मानले आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांचाही उल्लेख केला. व्हिडिओ शेअर करताना मिया खलिफाने, “या स्वादिष्ट जेवणासाठी रुपी कौर यांचे आभार, आणि गुलाबजाम पाठवणाऱ्या जगमीत सिंह यांचेही धन्यवाद. जेवण झाल्यावर स्वीट खाण्यासाठी माझ्या पोटात जागा शिल्लक राहत नाही, त्यामुळे मी जेवतानाच गोड पदार्थ खात आहे. असं म्हणतात की, दिवसात एक गुलाब कट्टरतावादाला दूर ठेवतो” असं ट्विटही केलं आहे. ट्विटसोबत #FarmersProtests हा हॅशटॅगही तिने वापरला आहे.

आणखी वाचा- मिया खलिफाच्या पोस्टरला केक भरवतायेत काँग्रेसचे कार्यकर्ते? जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य

मिया खलिफाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओवर युजर्सही विविध प्रतिक्रिया देत आहेत. मिया खलिफा आणि अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देणारं ट्विट केल्यानंतर भारतीय कलाकारांनी ‘आमच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप नको’ असं सुनावलं होतं. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, क्रिकेटर विराट कोहली, गायिका लता मंगेशकर, अभिनेता अक्षय कुमार आणि अजय देवगन अशा अनेकांनी या मुद्यावर आंतरराष्ट्रीय कलाकारांना उत्तर देण्यासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रायलयाने वापरलेल्या ‘इंडिया टुगेदर’ आणि ‘इंडिया अगेंस्ट प्रोपोगंडा’ या दोन हॅशटॅगचा वापर केला होता.

तर, मिया खलिफाने यापूर्वी शेतकरी आंदोलनाचं समर्थन करताना, “मानवाधिकाराचं इथं उल्लंघन होत आहे. नवी दिल्लीच्या आसपासच्या परिसरात इंटरनेट बंद केलं आहे”, असं ट्विट केलं होतं. नंतर दुसऱ्या ट्वीटमध्ये तिने काही कलाकारांना टार्गेट करत… पेड अॅक्टर्स… मला खात्री आहे की, पुरस्कारांच्या मोसमात यांच्या नावाला डावललं जाणार नाही. मी शेतकऱ्यांच्या सोबत आहे, असं म्हटलं होतं.